शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सरकारी अनुदान आले, शेतकरी मात्र सापडेनात! लाभार्थी गेले कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:42 IST

कोट्यवधीचे अनुदान पडून, अनुदानाचा लाभ देण्यासाठी संस्था लाभार्थींचा शोध घेत आहेत; परंतु दोन महिन्यांपासून १ हजार २५ शेतकऱ्यांचा पत्ताच लागला नाही़

हरी मोकाशे 

लातूर : हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री केलेल्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.सन २०१७- १८ मध्ये तूर, हरभरा खरेदी न होऊ शकलेल्या पात्र २ हजार ९२५ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ३ कोटी २६ लाख २५ हजार २४४ रुपये उपलब्ध झाले़ मात्र, दोन महिने उलटले तरी अनुदानाचा लाभ देण्यासाठी १ हजार २५ शेतकरी प्रशासनास सापडेनासे झाले आहेत़

सन २०१७- १८ मध्ये तूर आणि हरभºयाचे चांगले उत्पादन झाल्याने बाजारपेठेत दर घसरले होते़ परिणामी, शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर मिळाला होता़ त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रावर हा शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती आणि खरेदी न झालेल्या शेतकºयांसाठी राज्य सरकारने प्रति क्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर करून ही रक्कम नाफेडकडे वर्ग केली होती़

जिल्ह्यातील १ हजार १६० तूर उत्पादकांसाठी ९८ लाख ४० हजार ३२४ तर १ हजार ७६५ हरभरा उत्पादक शेतकºयांसाठी २ कोटी २७ लाख ८४ हजार ९२० रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते़ या पात्र शेतकºयांच्या याद्या तालुका पातळीवरील खरेदी केलेल्या शेतकरी संस्थांकडे पाठविण्यात आल्या होत्या़

या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकºयांनी बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डची प्रत देणे गरजेचे आहे़ दरम्यान, नाफेडने नियुक्त केलेल्या संस्थांमार्फत आजपर्यंत ६३९ तूर उत्पादक शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना ५५ लाख १४ हजार २८३ रुपयांचे तर १ हजार २६१ हरभरा उत्पादकांना १ कोटी ६३ लाख ७८ हजार ७०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेआहे़दोन महिन्यांपासून लाभार्थींचा शोधअनुदानाचा लाभ देण्यासाठी संस्था लाभार्थींचा शोध घेत आहेत; परंतु दोन महिन्यांपासून १ हजार २५ शेतकºयांचा पत्ताच लागला नाही़ तूर, हरभरा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला आहे़ आतापर्यंत १९०० शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे़ अद्याप १ हजार २५ शेतकºयांचा शोध सुरू आहे़ त्यामुळे १ कोटी ७ लाख ३२ हजार १६१ रुपये पडून आहेत, असे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश हेमके यांनी सांगितले़

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी