शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 07:30 IST

मंत्रिमंडळाची मंजुरी : रेडीरेकनरच्या २५% रक्कम भरावी लागणार

अतुल कुलकर्णी

मुंबई : १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी सरकारी भूखंडावर करण्यात आलेली अतिक्रमणे रेडीरेकनर दराच्या १० ते २५ टक्के रक्कम भरून नियमित करण्याचा मार्ग खुला झाला आहे. अतिक्रमण करण्यात आलेले भूखंड कमाल १५०० चौरस फुटाच्या मर्यादेत राहून नियमानुकूल करण्यात येणार आहेत. हा निर्णय राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनींवरील अतिक्रमणांना लागू राहाणार आहे.

अतिक्रमणे नियमित करताना अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अतिक्रमणधारकाकडून कब्जेहक्काची रक्कम आकारली जाणार नाही; मात्र उर्वरित प्रवर्गाच्या धारकांना ५०० चौ. फू. पेक्षा अधिकच्या अतिक्रमणासाठी रेडीरेकनर किमतीच्या १० टक्के तर १००० चौ.फू. पेक्षा अधिकच्या जागेसाठी २५ टक्के रक्कम आकारली जाणार आहे. जास्तीत जास्त १५०० चौरस फुटापर्यंतचे अतिक्रमण नियमित होणार असून त्यापुढील अतिक्रमण पाडल्याखेरीस बांधकाम नियमित केले जाणार नाही. शिवाय डोंगर, उताराची जमिन, सीआरझेड अशा ना विकास क्षेत्रातील अतिक्रमण देखील नियमित होणार नाही.‘सर्वांसाठी घरे’ची प्रभावी अंमलबजावणीशासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या आणि प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असलेल्या अतिक्रमणधारकांना लाभ देण्यासाठी ही योजना मंत्रिमंडळाने मंजूर केली आहे. यामुळे ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि पंतप्रधान आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती होईल.- प्रवीणसिंह परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHomeघर