शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या, २६ जानेवारीपासून सुरू होते उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 05:42 IST

सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतक-याचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने आयुष्य संपवित असल्याचे म्हटले आहे.

सायखेड (जि.अकोला ) : सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतकºयाचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने आयुष्य संपवित असल्याचे म्हटले आहे.हरिदास इंगळे यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले होते. त्यांना त्वरित अकोला येथे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथून नंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे सतत पाच दिवस मृत्यूशी झुंज देऊन पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे. या शेतात त्यांनी शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदून वर्षभरापूर्वी सौर कृ षी पंपाचा लाभ घेतला. त्याद्वारे त्यांनी शेतात उत्पादन घेणे सुरू केले; परंतु निसर्गाची साथ न मिळाल्याने त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यातच मायक्रो फायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.सरकारला चिठ्ठी :हरिदास इंगळे यांनी आत्महत्या करण्यापूर्र्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये ‘मी एक कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकरी असूनही सरकारने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे मी माझे आयुष्य संपवित आहे, असे नमूद केले आहे. ही चिठ्ठी त्यांच्या मृत्यूनंतर बुधवारी आढळून आली.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या