पुन्हा आघाडीचे सरकार येईल!
By Admin | Updated: August 6, 2014 23:44 IST2014-08-06T23:44:48+5:302014-08-06T23:44:48+5:30
येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला विजय मिळून देतील, असा विश्वास गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री सचिन आहिर यांनी व्यक्त केला.

पुन्हा आघाडीचे सरकार येईल!
>महाड : नरेंद्र मोदी यांच्या नावाने लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला राज्यात यश मिळाले असले तरी, आघाडी सरकारने राबवलेल्या विविध योजनाच येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला विजय मिळून देतील, असा विश्वास गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री सचिन आहिर यांनी व्यक्त केला.
महाडमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकत्र्याच्या मेळाव्यात ते कार्यकत्र्याना मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, कामगार नेते अॅड उदय आंबाणकर, तालुकाध्यक्ष सुभाष निकम आदि पदाधिकारी उपस्थित होते.
अहिर म्हणाले की, दिल्लीमधील महाराष्ट्र सदनातील जेवण चांगले मिळत नाही म्हणून शिवसेनेचे खासदार गोंधळ घालतात, मात्र सभागृहात राज्यातील अनेक प्रश्नांवर हेच खासदार मौन बाळगतात. जिल्हयातील महामार्गाची दुरवस्था, रेल्वे समस्या, वाढती महागाई आदी महत्त्वाच्या विषयावर शिवसेनेचे खासदार सभागृहामध्ये गप्प का बसतात असा सवाल अहिर यांनी केला. रायगड जिल्हयात नगरपालिका हद्दीत सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा किमतीत घरे देण्यासाठी शासकीय वा खाजगी जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा आपला मानस असल्याचे अहिर यांनी सांगितले.
महाडकर नागरिक गेली वर्षानुवष्रे पूर समस्येमुळे हैराण झाले आहेत. पुर नियंत्रणासाठी शासनाकडे आजवर अनेक वेळा प्रस्ताव पाठवण्यात आले मात्र याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना वा निर्णय होवू शकला नाही. याबाबत आहिर यांनी खेद व्यक्त केला. मात्र जिल्हापातळीवर पूरनियंत्रणासाठी स्पेशल हेड तयार करून या हेडखाली निधी उपलब्ध करण्याचे आश्वासनही अहिर यांनी यावेळी दिले.
सावित्री नदीर्पयत सांडपाणी वाहून नेणा:या वाहिनीसाठी बावीस कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कार्यवाही होणार असल्याची घोषणा अहिर यांनी यावेळी केली. दरडग्रस्तांना घरे बांधून देण्यासाठी सिध्दीविनायक ट्रस्टकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रय} करणार असल्याचेही अहिर यांनी सांगितले.