सरकारी वकिलांना दिलासा
By Admin | Updated: May 6, 2015 05:02 IST2015-05-06T05:02:48+5:302015-05-06T05:02:48+5:30
कार्यकाळ शिल्लक असतानाही राज्यातील जुन्या सरकारी वकिलांच्या नियुक्त्या संपुष्टात आणण्याच्या नवीन सरकारच्या प्रयत्नांना अखेर ब्रेक लागला आहे.

सरकारी वकिलांना दिलासा
औरंगाबाद : कार्यकाळ शिल्लक असतानाही राज्यातील जुन्या सरकारी वकिलांच्या नियुक्त्या संपुष्टात आणण्याच्या नवीन सरकारच्या प्रयत्नांना अखेर ब्रेक लागला आहे. नवीन सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांच्या दिवशीच राज्यभरातील आधीच्या सर्व सरकारी वकिलांच्या नियुक्त्या आपोआप संपुष्टात आणण्याची जाहिरातीतील अट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी रद्द केली. त्यामुळे कार्यकाळ शिल्लक असलेल्या राज्यभरातील सरकारी वकिलांना दिलासा मिळाला आहे.
युती सरकारने १६ मार्च रोजी सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात राज्यभरातील न्यायालयांमधील सरकारी वकिलांच्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. नवीन नियुक्त्यांच्या दिवशी सध्या कार्यरत वकिलांच्या नियुक्त्या संपुष्टात येतील, अशी अट होती. (प्रतिनिधी)