किडनी आजाराने ग्रस्त गोरेगावात फिल्टर प्लांट

By Admin | Updated: June 1, 2014 01:02 IST2014-06-01T00:52:54+5:302014-06-01T01:02:53+5:30

प्रभाव लोकमतचा: अकोला जिल्ह्यातील गोरेगाव फिल्टर प्लांट व विहिरीसाठी १ कोटीची तरतूद.

Goregaon Filters Plant with Kidney Disease | किडनी आजाराने ग्रस्त गोरेगावात फिल्टर प्लांट

किडनी आजाराने ग्रस्त गोरेगावात फिल्टर प्लांट

नरेंद्र बेलसरे/अकोला

अकोला जिल्ह्यातील गोरेगाव बुद्रूक येथील पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. दिलीप सोपल यांनी यासाठी एक कोटी रुपयापर्यंत अनुदान देण्याची तरतूद केल्याने गावात फिल्टर प्लांट व नवीन विहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील पाण्याचे सर्व स्रोत दूषित असल्यामुळे गावात मोठय़ा प्रमाणात किडनी आजाराची लागण झाली आहे. पाण्याच्या तपासणी अहवालावरू न या दूषित पाण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या पाण्यात नायट्रेट व मॅग्नेशिअमचे प्रमाण र्मयादेपेक्षा कितीतरी पट जास्त असल्याने हे पाणी अत्यंत घातक असल्याचे नागपूर येथील प्रयोगशाळेने म्हटले आहे. हा अहवाल गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश रामेकर, डॉ. ज्ञानेश्‍वर उमाळे यांनी पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांच्यापर्यंत पोहोचविला. यानंतर यंत्रणा कामाला लागली. गोरेगावासाठी तातडीने एक कोटी रुपयापर्यंत अनुदान देण्याची शासनाची तयारी असल्याचे ना. सोपल यांनी स्पष्ट केले. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यासाठी गावकर्‍यांना सांगण्यात आले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रस्ताव तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भूजल तज्ज्ञ व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता पुन्हा गावाची पाहणी करतील. या तज्ज्ञ अधिकार्‍यांचा प्रत्यक्ष अहवाल व ग्रामपंचायतचा प्रस्ताव, मंजूर ठराव, अंदाजपत्रक इत्यादी शासनाने मागितले आहे. ह्यलोकमतह्णने गोरेगाव बुद्रूक किडनी प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी फिल्टर प्लांट व विहिरीसाठी ग्रामपंचायतेचा ठराव आल्यानंतर योजना कार्यान्वित करण्यास विलंब लागणार नसल्याचे सांगीतले.

Web Title: Goregaon Filters Plant with Kidney Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.