शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गोपीचंद पडळकर - प्रकाश आंबेडकर यांच्यात दोन तास खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 17:08 IST

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी रविवारी सकाळी राजगृहावर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दोन तास चर्चा केली. यावेळी उत्तमराव जानकर यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. 

ठळक मुद्देधनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी रविवारी सकाळी राजगृहावर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दोन तास चर्चा केली.येत्या 27 फेब्रुवारीला गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर यांच्यासह धनगर समाजाचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.या आंदोलनाची सुरुवात प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार असून त्याचे निमंत्रणही यावेळी देण्यात आले. 

- धनाजी कांबळे

मुंबई : धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी रविवारी सकाळी राजगृहावर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दोन तास चर्चा केली. यावेळी उत्तमराव जानकर यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात एक झंझावात सुरू केला असताना विविध पक्ष संघटनांतील कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर यांच्याशी जवळीक साधत असल्याचे चित्र आहे. धनगर आरक्षणावरून सध्या राजकारण तापत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धनगर समाजाला न्याय मिळत नाही, अशी भावना धनगर समाजाची झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या लढाईसाठी प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेषतः गोपीचंद पडळकर यांची लोकप्रियता आणि त्यांना धनगर समाजात असलेल्या पाठिंब्यामुळेच सांगली येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेतून गोपीचंद पडळकर यांना आघाडीत येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र गोपीचंद पडळकर हे लोकसभेसाठी नाही, तर विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.  डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चवदार तलावाच्या ठिकाणी सत्याग्रही केला. त्या ऐतिहासिक ठिकाणावरून धनगर समाज पुन्हा एकदा सरकार दरबारी धडक मारणार आहे. येत्या 27 फेब्रुवारीला गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर यांच्यासह धनगर समाजाचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार असून त्याचे निमंत्रणही यावेळी देण्यात आले. दरम्यान, राजकीयदृष्ट्या ही एक राजकीय घडामोड असून आगामी निवडणुकीत याचा निश्चितपणे परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बंद खोलीत केलेली चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र