शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:09 IST

पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते टकले यांच्याविरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा नोंदवला. विधानभवन सुरक्षा अधिकारी सचिन पाटणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानभवन राडा प्रकरणात मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवत हृषीकेश ऊर्फ सर्जेराव बबन टकले आणि नितीन देशमुख यांना मध्यरात्री अटक केली. देशमुखांच्या अटकेनंतर संतप्त आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट पोलिसांच्या गाडीसमोरच स्वत:ला झोकून दिले. त्यांना गाडीसमोरून फरफटत बाजूला करण्याची वेळ पोलिसांवर आली. सरकारी कामात अडथळा प्रकरणी आव्हाड यांच्याविरोधातही शुक्रवारी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते टकले यांच्याविरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा नोंदवला. विधानभवन सुरक्षा अधिकारी सचिन पाटणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अटकेला केला विरोध, कार्यकर्तेही आक्रमक मध्यरात्री पोलिस देशमुख यांना विधानभवनातून ताब्यात घेण्यासाठी आले असताना आव्हाड यांनी प्रवेशद्वारासमोरच पोलिसांचे वाहन अडवले. आव्हाड यांनी पोलिसांच्या कारसमोर झोकून देत अटकेला विरोध केला. यावेळी त्यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले.  कारवाईला विरोध करीत घोषणाबाजी सुरू झाली. या हायव्होल्टेज ड्रामानंतर पोलिसांवर अखेर आव्हाडांना फरफटत बाजूला केले. त्यानंतर पोलिस देशमुख यांना घेऊन मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात आले. काही वेळातच आव्हाडांसह रोहित पवार आणि इतर पक्ष कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर घेराव घातला.

गुन्हेगारीचा लेखाजोखा काढण्यास सुरुवातटकले, देशमुख यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शिवमल्हार क्रांती सेनेचा सांगली जिल्हाध्यक्ष टकलेविरुद्ध यापूर्वी खुनी हल्ला, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा, विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत.त्याच्याविरुद्ध सांगलीत झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, देशमुख आणि टकले यांनी ६ ते ७ अनोळखी जणांसह विधानभवनात बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून हाणामारी केली. तसेच, कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांवरही बलप्रयोग केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

आमदार खुणावतात अन् गुंड देशमुखला मारतात : आव्हाडजे व्हिडीओ समोर येत आहेत, त्यात संबंधित आमदाराबरोबर उभ्या असलेल्या गुंडांना आमदार खुणवतो. त्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात आणि नितीन देशमुखला मारतात. आम्हाला अध्यक्ष सांगतात, आम्ही सगळ्यांना सोडून देतो, असे आमदार आव्हाड म्हणाले. त्यानंतर अचानक मला फोन येतो, नितीन देशमुखला अटक केली. मी यासंदर्भात पोलिसांना विचारले की,  अटक कशासाठी करण्यात आली आहे ? तर पोलिस सांगतात की, आम्हाला फक्त पोलिस स्टेशनला घेऊन जा, असे आदेश होते. त्यामुळे मी लोकशाही पद्धतीने पोलिसांच्या गाडीसमोर आंदोलन केले, असे आव्हाड यांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभा