शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

गोपाला गोपाला; दूध का अमूलला?

By सुधीर लंके | Updated: March 10, 2024 10:33 IST

‘आनंद’ प्रकल्पातून गुजरातने सहकारी दूध धंद्यात आपले पाय रोवले.

सुधीर लंके, निवासी संपादक, अहमदनगर

देशात जेवढ्या गायी आहेत. त्यातील ८.६५ टक्के गायी महाराष्ट्रात आहेत. म्हशींचे हे प्रमाण ६.५३ टक्के आहे. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांत महाराष्ट्रापेक्षाही दुभती जनावरे अधिक आहेत. पण, म्हणून महाराष्ट्राचे दूध धंद्यातील महत्त्व कमी होत नाही. ‘गोपाला, गोपाला’ म्हणत येथील गाडगेमहाराजांनी गुरे पाळणाऱ्या शेतकरी समाजाला साद घातली. पण महाराष्ट्र आज दुधात गुजरातच्या ‘अमूल अमूल’चा गजर करतो आहे. दुधातील ‘महानंद’ हा आपला सहकारी ब्रँड महाराष्ट्र जपू शकलेला नाही.

‘आनंद’ प्रकल्पातून गुजरातने सहकारी दूध धंद्यात आपले पाय रोवले. धवल क्रांतीतील ते एक रोल मॉडेल ठरले. वर्गीज कुरियन यांनी ती क्रांती साधली. दूध धंद्यातील ती पकड गुजरातने आजही सोडलेली नाही. त्यांचा ‘अमूल’ हा ब्रँड आता गुजरातच्या सीमा ओलांडून परराज्यातील सहकार क्षेत्राशी लढाई करतो आहे. कर्नाटक राज्यात गत विधानसभा निवडणुकीत कर्नाटकचा दुधाचा स्थानिक ब्रँड ‘नंदिनी’ आणि‘ ‘अमूल’ यांच्यात संघर्ष झाला. तत्कालीन भाजप सरकारने ‘अमूल’ला कर्नाटकात परवानगी देण्याचे धोरण घेतल्याने तेथे काँग्रेसने तो प्रचाराचा मुद्दा बनविला. ‘सेव्ह नंदिनी’ हा हॅश टॅग तेथील निवडणुकीत भाजप विरोधकांनी चालविला. २१ हजार कोटींच्या नंदिनी ब्रँडला अमूल गिळून टाकेल, ही भीती कर्नाटकला होती. ती भीती आज महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्र ‘सेव्ह महानंद’ म्हणतो आहे.

‘महानंद’ हा मुंबईस्थित सहकारी दूध संघ तोट्यात असल्याने त्याचे विलीनीकरण गुजरात मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळात (एनडीडीबी) करण्याचे प्रस्तावित आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गुजरात ‘महानंद’ पळवत आहे, असा आरोप झाला आहे. 

शेतकरी नेत्यांचा आक्षेप काय आहे?

दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव सहकार आणि सरकार दोघेही देऊ शकलेले नाहीत. खासगीवाले शोषण करतातच, पण येथील सहकार क्षेत्रही अनैतिक बनले आहे. तेथे भ्रष्टाचार सुरू आहे. दुधाला किमान ३४ रुपये प्रती लिटर भाव द्या, दुधाला ‘एफआरपी’ (निश्चित आणि लाभदायक किंमत) द्या, यासाठी शेतकरी नेते लढा देत आहेत. दुधाच्या पावडरला आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव मिळत नाहीत. म्हणून भाव पडतात. तसेच दूध हा नाशवंत पदार्थ आहे. म्हणून भाव देणे परवडत नाही, असा सरकारचा व खासगी कंपन्यांचा दावा असतो. 

महाराष्ट्रात दुधाचा प्रक्रिया खर्च मोठा

महाराष्ट्रातील दुधाचा प्रक्रिया खर्च मोठा आहे. शेतकऱ्याला आज दुधाचा २६ ते २७ रुपये दर मिळतो. पण बाजारात हेच दूध पिशवीत आल्यानंतर त्याची किंमत ४४ ते ४५ रुपयांपर्यंत जाते. म्हणजे १७ ते १८ रुपये भाव मधील प्रक्रियेत वाढतो. गरजेपेक्षा दूध अतिरिक्त झाल्याने दुधाचे भाव पडतात, असेही सांगितले जाते. पण, दरडोई दूध उत्पादनात महाराष्ट्र सरासरीच्या मागे आहे. गोकुळसारखे सहकारी दूध संघ ३३ रुपयांपर्यंत दर देतात.

लोक दुधापासून का दूर जात आहेत

२०२२-२३ साली देशाची दुधाची दरडोई उपलब्धता सरासरी ४५९ ग्रॅम प्रतिदिन आहे. महाराष्ट्राचा हा आकडा ३२९ आहे. गुजरात (६७०), मध्य प्रदेश (६४४), उत्तर प्रदेश (४२६) या सरासरीत पुढे आहे. दुधाची भेसळ ही देखील महाराष्ट्रातील मोठी समस्या आहे. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभाग शुद्ध दुधाची हमी महाराष्ट्राला देऊ शकलेला नाही. परिणामी अनेक लोकांनी दूध पिणे व दुधाचे पदार्थ खाणे सोडले आहे. लोक दुधापासून दूर जात आहेत. ही समस्याही दूध धंदा अडचणीत टाकत आहे. 

एकदा दुधावर प्रक्रिया करून त्याची पावडर किंवा अन्य पदार्थ बनले की दुधाचे आयुष्य वाढते. दूध नाशवंत राहत नाही. मग भाव द्यायला काय हरकत आहे? दुधाला सरकारने पाच रुपये अनुदान जाहीर केले. पण ‘ई गोपाला’त आता जनावरांची ऑनलाइन नोंदणी सक्तीची आहे. खाटी जनावरे जेव्हा दुभती होतात तेव्हा हा बदलही ऑनलाइन अपडेट करावा लागतो. शेतकरी तेवढा सक्षम, ई-साक्षर नाही. पर्यायाने असे शेतकरी अनुदानाला मुकतात. - अजित नवले, किसान सभेचे नेते

महानंदला ऊर्जितावस्था आणण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. हे तात्पुरते धोरण आहे. महानंदची स्थिती सुधारल्यावर हा ब्रँड पुन्हा आपलाच असेल.’ सहकारी दूध धंदे तोट्यात का जात आहेत? याबाबत परजणे यांचे विश्लेषण हे आहे की ‘दूध धंद्यातील स्पर्धा ही अनैतिक पातळीवर गेली आहे. खासगी दूध धंद्याच्या तुलनेत सहकार क्षेत्राला बंधने अधिक आहेत. खासगी क्षेत्रावर तेवढी बंधने नाहीत. त्यामुळे कर्नाटकच्या धर्तीवर राज्यातील सरकार दूध धंद्याचे निकष बदलवत आहे. यातून भविष्यात परिस्थिती सुधारेल. - राजेश परजणे, मावळते अध्यक्ष, महानंद 

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरी