गुगल, यू ट्यूबवर २५ कोटींचा दावा

By Admin | Updated: January 12, 2017 03:16 IST2017-01-12T03:16:40+5:302017-01-12T03:16:40+5:30

अश्लील व्हिडिओ, बनावट फोटो तयार करून ते जगभर प्रसिद्ध करून प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी पुण्यातील

Google claims 25 crores on YouTube | गुगल, यू ट्यूबवर २५ कोटींचा दावा

गुगल, यू ट्यूबवर २५ कोटींचा दावा

पुणे : अश्लील व्हिडिओ, बनावट फोटो तयार करून ते जगभर प्रसिद्ध करून प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी पुण्यातील अभिनेत्रीने गुगल व यू ट्यूबवर २५ कोटी रुपयांचा दावा बुधवारी दाखल केला.
पुण्यात राहणाऱ्या या अभिनेत्रीने शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयामधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला आहे़ ही अभिनेत्री हिंदी चित्रपटांत काम करीत असून, तिचे भरपूर व्हिडिओ यू ट्यूब व गुगलवर दाखवीत असून त्यांच्या माध्यमातून तिला शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास होत आहे़ तिची कलाकाराची बनलेली छबी तोडण्याचा प्रयत्न व मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे़ तिची प्रतिमा मलिन करून गुगल व यू ट्यूबने २ कोटी ८० लाख रुपये आतापर्यंत कमावले असल्याचे न्यायालयात केलेल्या दाव्यात म्हटले आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Google claims 25 crores on YouTube