मालगाडीचे इंजीन घसरले

By Admin | Updated: June 8, 2014 00:58 IST2014-06-08T00:58:35+5:302014-06-08T00:58:35+5:30

मालगाडीचे डबल इंजीन व एक डबा बडनेरा रेल्वेस्थानकानजीक क्रॉसिंग पॉईंटवर रूळाखाली घसरल्याने तीन तासपर्यंंत दोन्ही बाजूने वाहतूक प्रभावित झाली होती. शुक्रवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली.

The goods train collapsed | मालगाडीचे इंजीन घसरले

मालगाडीचे इंजीन घसरले

वाहतूक प्रभावित : बडनेरा स्थानकावरील घटना
बडनेरा : मालगाडीचे डबल इंजीन व एक डबा बडनेरा रेल्वेस्थानकानजीक क्रॉसिंग पॉईंटवर रूळाखाली घसरल्याने तीन तासपर्यंंत दोन्ही बाजूने  वाहतूक प्रभावित झाली होती. शुक्रवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. यात सुदैवाने कुणालाही इजा पोहोचली नाही. 
गव्हाच्या पोत्यांनी भरलेली रेल्वे मालगाडी यार्डमध्ये जात असताना बडनेरा रेल्वेस्थानकापासून अगदी जवळच सेक्शन इंजिनिअर कर्षण  कार्यालयासमोर या रेल्वेचे दोन इंजीन व लगतचा एक डबा रूळाखाली घसरला. यामुळे रात्री तीन तासपर्यंंत मुंबई, मद्रास, कोलकाता, दिल्ली यासह  इतरही ठिकाणी जाणार्‍या प्रवासी तसेच मालगाड्या खोळंबून होत्या. ही मालगाडी एका क्रॉसिंग पॉईंटवरून हळूहळू जात असताना घसरली. घसरलेले  दोन्ही इंजीन व डबा  सुरळीत करण्यासाठी भुसावळ येथून अँक्सिडेंटल रिलीफ ट्रेन बोलविण्यात आली होती. या ट्रेनमध्ये  क्रेन, ब्रेक डाऊनची  व्यवस्था, अत्याधुनिक ज्ॉक्स, मशिनरीज असतात. त्याच्या  साहाय्याने दुसर्‍या दिवशी सकाळी १0 वाजेपर्यंंत इंजीन व रेल्वे डबा रूळावर आणण्यात  आला. या दुर्घटनेत रूळदेखील उखडले होते. ते सुरळीत करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू होते. ज्या ट्रॅकवर इंजिन घसरले तो ट्रॅक मालधक्याकडे जातो.  यामुळे मालधक्यावर माल भरून असणार्‍या रॅक जाऊ शकल्या नाहीत. सकाळच्या प्रवासी गाड्या मात्र सुरळीत धावल्या.
दुर्घटनेच्या ठिकाणी भुसावळ मध्य रेल्वेचे सहायक प्रबंधक बारापात्रे, जैन स्टेशन मास्तर कोटांगळे, वाडेकर, किशोर लोहबरे यांच्यासह इतरही रेल्वेचे  अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: The goods train collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.