काल परवापर्यंत साहेब बरे होते...?

By Admin | Updated: June 13, 2016 22:37 IST2016-06-13T22:37:27+5:302016-06-13T22:37:27+5:30

शरद पवार यांची स्मरण शक्ती दांडगी आहे. त्यांची ही शक्ती मला मिळावी, असे मला कधी वाटत.

Goodbye until tomorrow ...? | काल परवापर्यंत साहेब बरे होते...?

काल परवापर्यंत साहेब बरे होते...?

ऑनलाइन लोकमत

बारामती,  दि. १३ - शरद पवार यांची स्मरण शक्ती दांडगी आहे. त्यांची ही शक्ती मला मिळावी, असे मला कधी वाटत. साहेबांच्या डोक्याला डोक लावून झोपलं, तर त्यांचे ज्ञान मला मिळेल अस वाटतंय. किंवा माझ्याच डोक्यातल त्यांच्या डोक्यात जाऊन ते बिघडल्यासारखे वागतील. तुम्ही म्हणाल, काल परवापर्यंत साहेब बरे होते, असे का वागायला लागले या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मिश्कील वक्तव्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

बारामती नगरपालिकेच्या सभागृहाचे नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात शरद पवार यांच्या स्मरणशक्तीवर बोलताना माझ्याच डोक्यातलं त्यांच्या डोक्यात जाऊन ते बिघडल्यासारखे वागतील, असे वक्तव्य अजित पवार यांनी मिश्कील टिप्पणी करत केले. मात्र, मागील आठवड्यातच नेते कार्यकर्त्यांनी भाषण करताना जिभेवरचा तोल जाऊ देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले होते.

बारामतीतील कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या स्मरण शक्तीचे कौतुक करताना स्वत:मधील उणिवांची जाणीव अजित पवार यांनी करून दिली. सभागृहातील उपस्थितांनी त्यांच्या वक्तव्यावर मनमुराद हसून दाद दिली. मात्र, शरद पवार आपल्यापेक्षा अधिक ताकतीचे आहेत, हे देखील सूचक विधान त्यांनी केले.
 

Web Title: Goodbye until tomorrow ...?