गुडबाय 2014
By Admin | Updated: December 31, 2014 01:12 IST2014-12-31T01:12:12+5:302014-12-31T01:12:12+5:30
‘थर्टी फर्स्ट’च्या नावाखाली ‘आनंद’ साजरा करण्याची नवीनच ‘धांगडधिंगा’ संस्कृती उदयाला आली आहे. शहरातील हॉटेल्स, पब्ज, रेस्तरां आणि बारमध्ये रात्रभर हातात मद्याचे ग्लास, तोकडे कपडे

गुडबाय 2014
नागपूर : ‘थर्टी फर्स्ट’च्या नावाखाली ‘आनंद’ साजरा करण्याची नवीनच ‘धांगडधिंगा’ संस्कृती उदयाला आली आहे. शहरातील हॉटेल्स, पब्ज, रेस्तरां आणि बारमध्ये रात्रभर हातात मद्याचे ग्लास, तोकडे कपडे व झिंगलेल्या वातावरणात थिरकणारी तरुणाई दिसून येते. अशा वातावरणात तरुणाईचे पाऊल वाकडे पडते. परंतु नववर्षाचे स्वागत या सर्वांशिवाय आपल्या लोकांच्या सान्निध्यात व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात केल्यास वर्षभर त्याचा आनंद टिकून राहतो. ‘एन्जॉय’ करण्याची पद्धत ही सुसंस्कृत व कोणाचे नुकसान करणारी नसावी. २०१४ सालातील कटू व गोड आठवणींपासून योग्य तो मतितार्थ घेऊन २०१५ मधील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायलाच हवे...
तरुणींनो, टेक केअर!
पार्टीसाठी बाहेर जात असल्यास त्याची पूर्ण माहिती घरच्यांना द्या.
थर्टी फर्स्टला रात्री बाहेर जायचेच झाले तर मैत्रिणी व कुटुंबीयांसोबत जा.
ऐनवेळी त्रास नको याकरिता मोबाईलची बॅटरी चार्ज करून ठेवा.
अंगप्रदर्शन करतील असे कपडे घालणे टाळा.
पर्समध्ये मिरचीपूड व टोकदार पिन ठेवा.
कोणी त्रास देत असेल तर थेट पोलिसांशी संपर्क करा. समोरच्या व्यक्तीच्या गाडीचा क्रमांक लक्षात ठेवा.
पार्टीमध्ये अनोळखी व्यक्तीने दिलेली कुठलीही गोष्ट खाऊ किंवा पिऊ नका. अनोळखी व्यक्तीला ‘लिफ्ट’ मागू नका.