खुशखबर...पेट्रोल, डिझेल स्वस्त !

By Admin | Updated: July 31, 2016 19:43 IST2016-07-31T18:26:21+5:302016-07-31T19:43:40+5:30

पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १ रुपया ४२ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर २ रुपये १० पैशांनी कपात जाहीर केली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीनंतर लागू होतील.

Good news ... petrol, diesel cheap! | खुशखबर...पेट्रोल, डिझेल स्वस्त !

खुशखबर...पेट्रोल, डिझेल स्वस्त !

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ : पेट्रोल प्रति लिटर १ रुपया ४२ पैशांनी, तर डिझेल २ रुपये १ पैशाने स्वस्त झाले आहे. चालू महिन्यात दर कपातीची ही तिसरी वेळ आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच सुधारित दर लागू होतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याचा दर आणि चलन विनिमय दराच्या पार्श्वभूमीवर ही दर कपात करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ६१.०९ रुपये आणि डिझेलचा दर ५२.२७ पैसे असेल, असे इंडियन आॅईल कॉर्पोरेशन या सरकारी तेल विपणन कंपनीने सांगितले.
 
या आधी १६ जुलै रोजी पेट्रोलच्या दरात सव्वादोन रुपयांची, तर डिझेलच्या दरात ४२ पैशांची कपात करण्यात आली होती. १ जुलै रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ८९ पैसे व ४९ पैशांची कपात करण्यात आली होती. या दरकपातीआधी १ मेपासून चार वेळा दर वाढविण्यात आले होते.
 
तेल कंपन्या १५ दिवसातून एकदा पेट्रोल व डिझेलच्या किमतीची समीक्षा करतात, ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर आणि घरगुती पातळीवरील चलन विनिमय दर विचारात घेण्यात येत असतो. याच आधारावर इंधनदरात कपात व वाढ याबाबत निर्णय घेण्यात येतो.

 

Web Title: Good news ... petrol, diesel cheap!