शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:40 IST

HSRP Number Plate Deadline Extended: राज्यात २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी राज्यातील वाहनधारकांची गडबड सुरू आहे.

HSRP Number Plate New Deadline: राज्यात २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी राज्यातील वाहनधारकांची गडबड सुरू आहे. पण, पाट्यांचा पुरवठा कमी असल्यामुळे नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत. यामुळे आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 

दरम्यान, आता उच्च सुरक्षा क्रमांक नोंदणी पाटी लावण्यासाठी वाहनधारकांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ३० टक्के वाहनधारकांनीच नोंदणी पाटी बसवून घेतली आहे. तर ही मुदतवाढ शेवटची असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. या मुदतीमध्ये नोंदणी केली नाहीतर वाहनधारकांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे. 

इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?

एक एप्रिल २०१९ पूर्वीची राज्यात दोन कोटी वाहने आहेत. या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशामुसार परिहवन विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून अंबलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आधी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. यानंतर ही मुदत ३० एप्रिल केली. 

दरम्यान, मधल्या काळात अपुरी केंद्रे, प्रशिक्षित कामगारांचा अभाव आणि इतर तांत्रिक त्रुटींचा अभाव असल्याने अनेकांना अडचणी आल्या. यामुळे पुन्हा एकदा परिवहन विभागाने ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवली होती. पण, या नंबरप्लेट बसवून घेण्यात अजूनही वाढ झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता प्रशासनाने आणखी मुदतवाढ दिली आहे. याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मुदतवाढीची मागणी केली होती. यानंतर सरनाईक यांनी १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ केल्याचे जाहीर केले आहे. याबाबत परिवहन विभागाचे आयुक्तांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे.  

अशी असते एचएसआरपी

अ‍ॅल्युमिनियमपासून बनलेली

जाडी १ मिलीमीटरपेक्षा थोडी अधिक

क्रोमियम आधारित होलोग्राम स्टिकर आणि टॅम्पर-प्रूफ लॉक

होलोग्राम खाली लेझर बैंडेड १० अंकी पिन कोड असतो

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरstate transportएसटी