शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

दिलासा! राजुरा तालुक्यात पाहणीनंतर आता पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 17:07 IST

सोयाबीनची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर अवकाळीमुळे संकट आले होते

Sudhir Mungantiwar Soyabean Farmers: अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या, आणि सतत अनिश्चिततेच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावाने त्रस्त केले; या शेतकऱ्यांच्या मदतीला राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार धावून आले; ना. मुनगंटीवार यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा प्रत्यक्ष शेतावर भेटू देवून जाणून घेतली: या बाबताची वस्तुस्थिती मा. मुख्यमंत्री, मा. कृषिमंत्री यांना अवगत करून, विशेष पॅकेज जाहीर करण्याची विनंती केली. तसेच राज्याचे मा. कृषिमंत्री व कृषीसचिवांना राज्यातील इतर जिल्ह्यातही अशाप्रकारे नुकसान झाले असल्यास त्या बाबत स्वतः लक्ष देवून आढावा घेण्याबाबत विनंती केली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलीत म्हणून शासनाने आता राज्यातील सोयाबीनच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारचे मदत व पुनर्वसन विभागाचे आदेश सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी निर्गमित झाले आहेत. या निर्णयामुळे चंद्रपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील सोयाबीन पिक वाढीच्या अवस्थेत असताना पडलेला पावसाचा खंड व अनियमित हवामान यामुळे जिल्हयात भात , सोयाबीन व कापूस या मुख्य पिकांवर किड व रोगाचा प्रादुर्भाव  आढळून आला होता. कृषि विभागामार्फत नियमीतपणे पिकांचे किड व रोगांचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन वेळोवेळी शेतकऱ्यांना आवश्यक ते तांत्रीक मार्गदर्शन करुन किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. सोयाबीन पिकावर किड व रोगाचा प्रादुर्भाव होवून पिक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर  राज्याचे वने,सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे  पालकमंत्री ना. श्री . सुधीर मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोना (खु) येथे तातडीने जाऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची  प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिल्यानंतर यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांनी  यंत्रणेला तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले व मंत्रालयात यासंदर्भात पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

सोयाबीन पिकावर मुळकूज, खोडकूज, व रायझेक्टानिया एरीयल ब्लाईट या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला.  त्याची तातडीने दखल घेत प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत तातडीने मदत देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले. त्या अनुषंगाने  प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या जोखिमेच्या बाबींतर्गत जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा सरंक्षणाच्या 25 % रक्कम तातडीने देण्याबाबतची अधिसुचना निर्गमित करण्यात आली व तशा सुचना ओरीयंटल ईन्शूरंस कंपनीस देण्यात आल्या. मा. पालकमंत्र्यांनी सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीची कारणमीमांसा तसेच भविष्यातील व उपाययोजना आखण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञाची चमू पाचारण करून वस्तूस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याबाबत सुचित केले. त्या अनुषंगाने डॉ पंजाबराव देशमुख  कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांनी संयुक्त सर्व्हेक्षण करून शासनास अहवाल सादर केला.

जिल्हयात पावसाची सुरुवात 22 जून पासून झाली असल्याने  हंगामातील पेरण्या उशिराने म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवडयात सुरु झाल्या . जून महिन्यात सरासरीच्या 47.9 टक्के , जुलै महिन्यात सरासरीच्या 153.8 टक्के, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 52 टक्के व  सप्टेंबर 2023 महिन्यात सरासरीच्या 113.6 टक्के , अशाप्रकारे अनियमीत स्वरुपाचा पाऊस पडलेला आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचे २ ते ३ मोठे खंड पडल्यामुळे तसेच वातावरणातील व जमिनीतील वाढलेले तापमान व त्यानंतर आलेल्या पावसामुळे प्रामुख्याने चारकोल रॉट व रायझोक्टोनिया करपा या रोगाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले. अश्या आकस्मिक वातावरण बदलामुळे जास्त कालावधीचे, वरील रोगांना संवेदनशील वाण जसे फुले संगम व फुले किमया हे वाण जास्त प्रमाणात बळी पडले. तसेच काही भागात सुरवातीच्या अवस्थेत खोडमाशी व चक्रभुंगा या किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकाचे मुख्य खोड पोखरल्या जावून जमिनीतील अन्नद्रव्याचे वहन कमी झाले व झाडे अशक्त होवून शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाने पिवळी पडली, त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत शेकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषि मंत्री धनंजय मुंडे यांना पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार आता चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील सोयाबीन पिकाच्या नुकसानग्रस्त क्षेत्रांचा पंचनामा करण्यात येणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार