शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबरमध्ये पावसाची गुड न्यूज, उद्यापासून बरसणार, पहिल्या आठवड्यात पुनरागमनाचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 07:22 IST

अवघा महाराष्ट्र आता सप्टेंबरच्या पावसाकडे डोळे लावून बसला आहे.

मुंबई : ऑगस्ट महिन्यात ओढ दिल्यानंतर सप्टेंबरही कोरडा जाणार, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच हवामान खात्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यासह मध्यात चांगला पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला किंचित का होईना दिलासा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात असून, अवघा महाराष्ट्र आता सप्टेंबरच्या पावसाकडे डोळे लावून बसला आहे.

सप्टेंबरमध्ये सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या महिन्यात जास्त पाऊस पडला तरीही यंदाच्या पावसाळ्याची सरासरी गाठण्याची शक्यता कमीच आहे.     - मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामान खाते

सप्टेंबरच्या मध्यात मध्य, दक्षिण द्विपकल्प, मराठवाडा, कोकण, गोव्यासह मध्य भारतातील काही भागात पाऊस येण्याची शक्यता आहे. ७ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रासाठी किरकोळ पावसाचा अंदाज कायम आहे. १० सप्टेंबरपर्यंत त्यात वाढ होऊ शकते. मुंबईसह कोकण व सह्याद्री घाटमाथ्यावर ३ ते १० सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस हाेईल.     - कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान शास्र विभाग 

११ ते १४ सप्टेंबरदरम्यानच्या पहिल्या, २५ ते २९ सप्टेंबरदरम्यानच्या दुसऱ्या आणि ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यानच्या तिसऱ्या अशा एकूण तीन पावसांच्या आवर्तनापैकी एखाद्या-दुसऱ्या आवर्तनातून महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता असू शकते.     - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

टॅग्स :Rainपाऊस