खुशखबर....BMW आता टॅक्सीच्या स्वरूपात
By Admin | Updated: October 24, 2016 20:48 IST2016-10-24T20:48:45+5:302016-10-24T20:48:45+5:30
मुंबई, दिल्ली आणि बंगळुरुमध्ये ओला ही सेवा सुरु करणार आहे.

खुशखबर....BMW आता टॅक्सीच्या स्वरूपात
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुंबईतील सामान्यांसाठी आता श्रीमंताची प्रतीक म्हणून ओळखली जाणारी बीएमडब्लू कार आता टॅक्सीच्या स्वरुपात उपलब्ध होणार आहे. आलिशान असलेली BMW कार आता मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणार आहे. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरुमध्ये ओला ही सेवा सुरु करणार आहे.
ABP माझाच्या वृत्तानुसार BMW आणि ओला यांनी एकत्रित यासंबधीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता BMW कार टॅक्सीच्या रुपात मुंबईच्या रस्त्यांवर धावाताना दिसणार आहे. 22 रुपये किलोमीटर दरानं ही गाडी ओलाच्या अॅपवर उपलब्ध होणार आहे.