शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं महायुतीकडे मागितल्या 'या' २० जागा
2
संघर्ष वाढणार? ओबीसी नेत्याकडूनही अंतरवाली सराटीतच आमरण उपोषणाची घोषणा
3
Rahul Gandhi : "मी पंतप्रधान मोदींसारखा देव नाही"; राहुल गांधी अडकले धर्मसंकटात, म्हणाले...
4
नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली....
5
डोंबिवली MIDC मधून शिंदे सेनेचे लोक...; संजय राऊत यांचा हल्लाबोल
6
युक्रेनने केलेल्या हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू; रशियन लष्करात झाले होते भरती
7
८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं? 
8
Uddhav Thackeray मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात
9
अजित पवार धर्मसंकटात? राज्यसभेसाठी उमेदवार ठरेना; दिल्लीचं तिकीट मुलाला, पत्नीला, की...?
10
शपथविधी झाला, खातेवाटप आटोपलं, आता या तारखेपासून सुरू होणार लोकसभेचं अधिवेशन
11
"संपूर्ण देशाच्या भावनांचा 'सत्यानाश' केलाय", वसीम अक्रम पाकिस्तानी संघावर संतापला!
12
रात्री झोपताना फोन उशीजवळ ठेवणं पडू शकतं महागात?; जाणून घ्या, किती असावं अंतर?
13
राम मंदिराची अभेद्य सुरक्षा; अयोध्येत बनणार NSG हब, ब्लॅक कॅट कमांडो तैनात होणार!
14
टाटा मोटर्स आणणार नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही; जाणून घ्या Curvv, Harrier आणि Sierra EV ची लाँच टाइमलाइन 
15
पाकिस्तानी चॉकलेट, हरभरे, शस्त्रास्त्रे अन्...; कठुआमध्ये हाहाकार माजवण्यासाठी दहशतवाद्यांनी काय-काय आणलं होतं
16
USA vs IND : "भारत मजबूत संघ असला तरी...", अमेरिकन शिलेदाराचा टीम इंडियाला इशारा 
17
Ramayan: कुंभकर्ण वर्षातून दोनदाच उठायचा; हा त्याच्यासाठी शाप होता की वरदान? वाचा!
18
Sargun Mehta : "Kiss केल्याने मुलं होतात..."; अभिनेत्रीला कॉलेजमध्ये रोमान्सची वाटायची खूप भीती
19
'प्रत्येकाचं घर चाललं पाहिजे'; मानधन कमी करण्यास कार्तिक आर्यनने दर्शवली तयारी, कारण...
20
'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला

ठेवणीतल्या सोन्याच्या दागिन्यांनी विठ्ठल रुक्मिणीला झळाळी

By admin | Published: July 26, 2016 1:59 PM

यात्रा संपल्यानंतर आजच्या शुभमुहुर्तावर विठ्ठल-रुक्मिणी देवाची प्रक्षाळपूजा मांडण्यात आली होती.

दीपक होमकर :पंढरपूर 
आषाढी यात्रेच्या निमित्ताने भाविकांना 24 तास दर्शन देण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणीचे नित्योपचार गेल्या 21 दिवसांपासून बंद करण्यात आले होते. यात्रा संपल्यानंतर आजच्या शुभमुहुर्तावर विठ्ठल-रुक्मिणी देवाची प्रक्षाळपूजा मांडण्यात आली होती. त्यानंतर देवाला ठेवणीतली सोन्याच्या दागिण्यांनी मडविण्यात आली त्यामुळे देवाचे रुप अतिशय लोभसवाणे झाले होते.
आज प्रक्षाळपुजेच्या निमित्ताने शेकडो भाविकांनी पहाटेपासूनच विठ्ठलाच्या पायाला लिंबू पाण्याने घासून देवाचा शिनवटा घालविण्याचा प्रयत्न केला. दुपारा बाराच्या सुमारास पहिली देवाला गरम पाण्याने अंघोळ घालण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजता प्रभारी कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांच्या हस्ते देवाला दुधाने व पंचामृताने अभिषेक करण्यात आल. सुमारे सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही पूजा चालली. त्याानंतर विठ्ठलाला सोन्याच्या मुकुटापासून तेे विविधा हिरे-माणिकांच्या दाग दागिन्यांनी सजविण्यात आले. दोन्ही कानांना सोन्याची मासळी लावल्यानंतर विठ्ठलाचे तेज आणखी तेजस्वी झाले. विठ्ठला-रुक्मिणीच्या मुर्तीबरोबर अवघा गाभारा, चार खांबी आणि सोळखांबी सभागृहही फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. त्यामुळे सायंकाळी धुपारतीच्या वेळी मंदिरातील वातावरण अतिशय प्रसंन्न झाले  आणि भाविक त्या वातारवणात हरवून गेले.
 
आज पासून देवाची शेजारती
 
आषाढी यात्रेत देवाची शेजारती करून देवाला झोपविण्याचा विधी बंद करण्यात आला होता. त्यामुळे देवाच्या शयनकक्षातील पलंगही काढून ठेवण्यात आला होता. आज प्रक्षाळपूजेनंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या पलंगाची विधीवत पुजा करून शयनकक्षाची साफसफाई करुन तो पुन्हा एकदा मांडण्यात आला. रात्री दर्शन बारी संपल्यानंतर देवाची शेजारती झाल्यावर देवाच्या निद्रेचा विधी आज करण्यात येणार असून आषाढीच्या निमित्त तब्बल 21 दिवस अखंड उभे असलेले विठ्ठल रुक्मिणी आजपासून विश्रांती घेणार आहे.