वॉशिंग मशिनमध्ये सापडले 60 लाख रुपयांचे गोल्ड बार

By Admin | Updated: May 3, 2016 19:07 IST2016-05-03T18:58:38+5:302016-05-03T19:07:40+5:30

मुंबई एअरपोर्टवर चक्क वॉशिंग मशिनमधून गोल्ड बार नेणा-या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Gold bars worth Rs 60 lakh found in washing machine | वॉशिंग मशिनमध्ये सापडले 60 लाख रुपयांचे गोल्ड बार

वॉशिंग मशिनमध्ये सापडले 60 लाख रुपयांचे गोल्ड बार

ऑनलाइन लोकमत

मुंबई,  दि. 3 - मुंबई एअरपोर्टवर चक्क वॉशिंग मशिनमधून गोल्ड बार नेणा-या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वॉशिंग मशिनमध्ये गुप्तरीत्या 19 सोन्याचे गोल्ड बार लपवण्यात आले होते. 
प्रवाशांच्या सामानाची चेकिंग होत असताना एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिका-यांच्या हे निदर्शनास आले आणि त्यांनी त्या प्रवाशाला अटक केली. सौदी अरेबियातल्या रियाधवरून आलेल्या मोहम्मद अस्लाम शेख मुंबई विमानतळावर उतरला असता, त्याच्याकडून हे गोल्ड बार जप्त करण्यात आले आहेत. 
या व्यक्तीकडे भारतीय पासपोर्टही आढळून आला आहे. सामानासोबत असलेल्या वॉशिंग मशिनच्या आतमध्ये गुप्तरीत्या हे 19 गोल्ड बार ठेवण्यात आले होते. चौकशीदरम्यान हे उघडकीस आले आहे. या गोल्डबारचं वजन 2204 ग्रॅम होतं. त्यांची किंमत जवळपास 60 लाख 15 हजार रुपयांच्या घरात आहे.

Web Title: Gold bars worth Rs 60 lakh found in washing machine