‘गोकूळ’चे दूध रुपयाने महागणार

By Admin | Updated: May 16, 2015 03:12 IST2015-05-16T03:12:10+5:302015-05-16T03:12:10+5:30

मुंबई येथील वितरकांचे कमिशन लीटरमागे एक रुपया वाढविल्याने ‘गोकूळ’ दुधाच्या ग्राहकांना गुरुवारपासून एक रुपया जादा मोजावा लागणार आहे.

Gokul's milk will cost Rs | ‘गोकूळ’चे दूध रुपयाने महागणार

‘गोकूळ’चे दूध रुपयाने महागणार

कोल्हापूर : मुंबई येथील वितरकांचे कमिशन लीटरमागे एक रुपया वाढविल्याने ‘गोकूळ’ दुधाच्या ग्राहकांना गुरुवारपासून एक रुपया जादा मोजावा लागणार आहे.
मुंबई येथील वितरकांनी कमिशन वाढीची मागणी करीत ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले होते. मुंबईतील ‘गोकूळ’, ‘महानंद’, ‘अमूल’, ‘वारणा’ या दूध संघांच्या दूध विक्रीवर परिणाम झाला होता. विक्रेत्यांशी अनेकवेळा चर्चा करूनही कमिशन वाढीवर विक्रेते ठाम राहिल्याने पेच निर्माण झाला होता.
विक्रेत्यांनी संप केल्याने ‘गोकूळ’चे मुंबई येथील रोज ८५ हजार लीटर दूध विक्री कमी झाली होती. या दुधाचे करायचे काय, असा प्रश्न कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासमोर होता. त्यानंतर सर्वच संघांच्या प्रशासनाने वितरकांशी चर्चा करून कमिशन वाढीबाबत निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gokul's milk will cost Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.