Konkan Railway Holiday Special Train Time Table: ३१ डिसेंबर, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकण, गोव्यात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. देश-विदेशातील पर्यटक गोव्यात नववर्षाच्या स्वागतासाठी जात असतात. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने अतिरिक्त जादा ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्यांना याचा लाभ होणार असून, या वाढीव ट्रेनचे वेळापत्रक समोर आले आहे.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि कर्नाटककडे जाणाऱ्या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर ते कर्नाटकातील ठोकूर दरम्यानची ट्रेन वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी या स्थानकांवर थांबून पुढे गोव्यात जाणार आहे.
ट्रेन क्रमांक ०९३०४ मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर ते कर्नाटकातील ठोकूर विशेष गाडी २१ आणि २८ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर नगर येथून दुपारी ४.३० वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री ३ वाजता ठोकूर येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९३०३ ठोकूर–डॉ. आंबेडकर नगर विशेष गाडी २३ आणि ३० डिसेंबर रोजी ठोकूर येथून पहाटे ४.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल.
तसेच बिलासपूर, छत्तीसगड ते मडगाव, गोवा दरम्यान विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. ट्रेन क्रमांक ०८२४१ बिलासपूर–मडगाव एक्स्प्रेस २० व २७ डिसेंबर २०२५ तसेच ३ जानेवारी व १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजता बिलासपूरहून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री २.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०८२४२ मडगाव–बिलासपूर एक्स्प्रेस २२ डिसेंबर व २९ डिसेंबर २०२५ तसेच ५ जानेवारी व १२ जानेवारी २०२५ रोजी मडगाव जंक्शनहून पहाटे ५.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता बिलासपूर येथे पोहोचेल.
Web Summary : Konkan Railway introduces special trains for Goa during the New Year. Trains will run from Dr. Ambedkar Nagar to Thokur and Bilaspur to Madgaon. Check schedules and stops for convenient travel.
Web Summary : कोंकण रेलवे ने नए साल के दौरान गोवा के लिए विशेष ट्रेनें शुरू कीं। ट्रेनें डॉ. अम्बेडकर नगर से ठोकूर और बिलासपुर से मडगांव तक चलेंगी। सुविधाजनक यात्रा के लिए समय और स्टॉप की जांच करें।