मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज दुपारी २ ते ३ वाजता मुंबई-पुणे हायवे भाताणजवळ (एक तास) वाहतूक बंद राहणार आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज तासभरासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) तर्फे भाताण-अजिवली वाहिनीचे २२ केव्ही वीजवाहिन्यांचे आणि फिडर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक बंदीचा कालावधी दुपारी २ वाजेपासून ३ वाजेपर्यंत असणार आहे. या दरम्यान कि.मी. ०९.६०० ते कि.मी. ०९.७०० या दरम्यान मुंबई आणि पुणे लेनवर सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच अवजड) वाहतूक पूर्णतः थांबवण्यात येईल. तर वाहनचालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
पर्यायी मार्ग :१. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहने कळंबोली सर्कल (जेएनपीटी रोड डी पॉईंट, पळस्पे) येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर वळवली जातील.२. तसेच शेडुंग एक्झिट (कि.मी. ०८.२००) येथूनही महामार्ग क्र. ४८ वर वळवले जाऊन खालापूर टोल नाका (कि.मी. ३२.२००) आणि मॅजिक पॉईंट (कि.मी. ४१.२००) येथून पुन्हा द्रुतगती मार्गावर प्रवेश मिळेल.३. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना खोपोली एक्झिट (कि.मी. ३९.१००) वरून महामार्ग क्र. ४८ वर वळवले जाईल.४. तसेच खालापूर टोल नाका एक्झिट (कि.मी. ३२.६००) येथून पाली ब्रीज मार्गे महामार्ग क्र. ४८ वर वाहने वळवली जातील.