गोडसे मंदिराची चौकशी सुरू!
By Admin | Updated: December 26, 2014 04:33 IST2014-12-26T04:33:57+5:302014-12-26T04:33:57+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेचे मंदिर बांधण्याकरिता अखिल भारतीय हिंदू महासभेने बुधवारी येथील शारदा मार्गावर भू

गोडसे मंदिराची चौकशी सुरू!
मीरत : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेचे मंदिर बांधण्याकरिता अखिल भारतीय हिंदू महासभेने बुधवारी येथील शारदा मार्गावर भूमिपूजन केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आचार्य मदन यांनी गोडसेला खरा राष्ट्रभक्त असे संबोधले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राम मंदिर व जम्मू-काश्मिरातील ३७० कलम रद्द करण्यातील उदासीनतेबाबत निर्भर्त्सना केली आहे. गोडसेच्या मंदिराच्या भूमिपूजनाची जिल्हा प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतली. संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे प्रभारी जिल्हाधिकारी नवनीत सिंग चहल यांनी स्पष्ट केले. या घटनेचा अहवाल मागविला असून तो आल्यावर आरोपींविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. (वृत्तसंस्था)