शहीद सूर्यवंशी यांचे पार्थिव साता-यात

By Admin | Updated: February 15, 2016 23:22 IST2016-02-15T22:43:08+5:302016-02-15T23:22:11+5:30

प्रतिकूल वातावरणात मातृभूमीचे रक्षण करताना सियाचीन येथे हिमस्खलन होऊन वीरगती प्राप्त झालेले मस्करवाडी (ता. माण) येथील जवान सुनील सूर्यवंशी यांचे पार्थिव सोमवारी रात्री उशिरा

The Goddess of Shaheed Suryavanshi- | शहीद सूर्यवंशी यांचे पार्थिव साता-यात

शहीद सूर्यवंशी यांचे पार्थिव साता-यात

>सातारा : प्रतिकूल वातावरणात मातृभूमीचे रक्षण करताना सियाचीन येथे हिमस्खलन होऊन वीरगती प्राप्त झालेले मस्करवाडी (ता. माण) येथील जवान सुनील सूर्यवंशी यांचे पार्थिव सोमवारी रात्री उशिरा साता-यात आणण्यात आले. मंगळवारी (दि. १६) मस्करवाडी येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
सियाचीन येथे दि. ३ फेब्रुवारी रोजी भारतीय सीमेचे रक्षण करताना हिमस्खलन होऊन लष्कराचे दहा जवान बर्फाखाली गाडले गेले होते. बेपत्ता जवानांचा शोध सहा दिवसांनी दि. ९ रोजी लागला होता. या दुर्घटनेत माण तालुक्याने सुनील सूर्यवंशी यांच्या रूपाने सुपुत्र गमावला.
 
 
लोकप्रतिनिधींकडून आदरांजली...
सोमवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी रुग्णवाहिका आणि लष्करी वाहन जिल्हा रुग्णालयाच्या आवारात दाखल झाले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदींनी पुष्पहार, पुष्पचक्र वाहून सूर्यवंशी यांना आदरांजली वाहिली. बरोबर दहा वाजता तिरंग्यात लपेटलेले शहीद सूर्यवंशी यांचे पार्थिव रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात आले आहे.

Web Title: The Goddess of Shaheed Suryavanshi-