गुगल मॅपमुळे देवीभक्त गोंधळले

By Admin | Updated: November 6, 2015 01:02 IST2015-11-06T01:02:28+5:302015-11-06T01:02:28+5:30

कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक थेट कळंबा (ता. करवीर) येथील अंबाबाई मंदिराकडे वळत आहेत. येथे आल्यावर त्यांना पत्ता चुकल्याचे निदर्शनास येत

Goddess confused due to Google map | गुगल मॅपमुळे देवीभक्त गोंधळले

गुगल मॅपमुळे देवीभक्त गोंधळले

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक थेट कळंबा (ता. करवीर) येथील अंबाबाई मंदिराकडे वळत आहेत. येथे आल्यावर त्यांना पत्ता चुकल्याचे निदर्शनास येत आहे. दररोज किमान चार ते पाच गाड्या या परिसरातून परत जात असल्याचे चित्र आहे. ‘गुगल मॅप’वरील गोंधळाचा हा परिणाम आहे. मॅपमध्ये अंबाबाई मंदिराचा मार्ग हा बंगलोर-पुणे महामार्गावरून शाहू टोल नाक्यावरून जात कळंबा गाव आहे. येथे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला जायचे आहे, अशी विचारणा झाल्यावर गोंधळ उडतो. असा प्रकार गावात दररोज घडत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Goddess confused due to Google map