चाकणजवळ गोदामाला भीषण आग
By Admin | Updated: November 5, 2014 04:21 IST2014-11-05T04:21:05+5:302014-11-05T04:21:05+5:30
यामध्ये एक कामगार किरकोळ भाजला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही़

चाकणजवळ गोदामाला भीषण आग
चाकण (जि़पुणे) : पुणे- नाशिक महामार्गालगत चाकणजवळील वाकी बुद्रुक गावाजवळ असलेल्या विजय लॉजिस्टिक या टाटा मोटर्स कंपनीच्या गोदामाला मंगळवारी रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे स्पेअरपार्ट जळून खाक झाले. यामध्ये एक कामगार किरकोळ भाजला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही़
वाकी बुद्रुक येथे सुमारे दहा ते बारा एक जागेमध्ये ३ लाख चौरस फुटाचे हे गोडाऊन आहे. मंगळवारी रात्री गोदामाना अचानक आग लागली. पत्राकोटींगच्या लेअर आणि गोडाऊनमधील साहित्यामुळे आग पसरली. संपूर्ण गोडाऊन आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले. काही स्पेअरपार्ट ज्वालाग्राही असल्याने मोठमोठे स्फोट होऊ लागले. गोडाऊनमध्ये सुमारे ८० कर्मचारी होते. सुदैवाने सायंकाळी सात ते आठ ही जेवणाची वेळ असल्याने ते सर्व जण कॅन्टीनमध्ये होते. त्यामुळे सुदैवाने जिवीत हानी झाली नाही़ आठ अग्निशमन बंबांद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला़