गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर कालवश

By Admin | Updated: October 28, 2016 15:42 IST2016-10-28T15:39:41+5:302016-10-28T15:42:16+5:30

गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले

Goa's first woman Chief Minister Shashikala Kakodkar Kalwash | गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर कालवश

गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर कालवश

>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २८ -  गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री  शशिकला काकोडकर यांचे शुक्रवारी  दुपारी निधन झाले. 
त्या 85 वर्षे  वयाच्या  होत्या. मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब  बांदोडकर यांच्या त्या कन्या होत. 70 च्या दशकात भाऊंच्या निधनानंतर त्या मुख्यमंत्री  बनल्या होत्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या त्या काही  वर्षे अध्यक्ष  होत्या. कट्टर मराठीवादी व साहित्यप्रेमी अशी त्यांची ओळख  होती. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. मुख्यमंत्री  लक्ष्मीकांत  पार्सेकर यांनी त्यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले.

Web Title: Goa's first woman Chief Minister Shashikala Kakodkar Kalwash