गो. मा. पवारांना व. दि. कुलकर्णी पुरस्कार
By Admin | Updated: August 20, 2016 19:03 IST2016-08-20T19:03:10+5:302016-08-20T19:03:37+5:30
ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार यांचा आज सायंकाळी डॉ. व. दि. कुलकर्णी स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

गो. मा. पवारांना व. दि. कुलकर्णी पुरस्कार
>सोलापूर, दि.२० - ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार यांचा आज सायंकाळी डॉ. व. दि. कुलकर्णी स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल व श्रीफल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या निवासस्थानी देऊन सन्मानित करण्याचा या पुरस्कार समितीचा पायंडा आहे. त्यानुसार ‘वदि’ यांच्या कन्या कविता निरगुडकर आणि प्रकाश निरगुडकर यांनी पवार यांच्या येथील ‘मुदिता’ या निवासस्थानी जाऊन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. पवार यांनी पत्नी सुजाता यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड, डॉ. राजशेखर शिंदे, प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यववर उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर डॉ. पवार यांनी डॉ. व. दि. यांच्या आठवणी सांगितल्या.