पोलिसांचा दर्जा होणार जागतिक

By Admin | Updated: June 11, 2014 02:27 IST2014-06-11T02:27:45+5:302014-06-11T02:27:45+5:30

या विषयातील तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

Globalization of Police Status | पोलिसांचा दर्जा होणार जागतिक

पोलिसांचा दर्जा होणार जागतिक

>मुंबई : पोलिस दलाच्या दृष्टीने जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाच्या आधारे अभ्यासक्रम व त्यानुसार प्रशिक्षण ठरविण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.  
भाजपाचे भाई गिरकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. सध्या पोलीस कान्स्टेबल म्हणून दहावीपर्यंतच्या शिक्षणाची अट आहे. सायबर 
सेल तसेच इतर तांत्रिक 
विभागात अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले उमेदवार उपलब्ध आहेत. त्यांच्या ज्ञानाची या विभागाला गरज आहे. 
पण म्हणून उच्चशिक्षितांना कॉन्स्टेबलच्या पदावर नेमणोही योग्य ठरणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी योग्य अशी पदे तयार करण्यात येतील. त्याप्रमाणो वेतन दिले जाईल. याचसाठी 3861 पैकी 1396 पदे 
अजून भरलेली नाहीत, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
पोलीस प्रशिक्षणात कोणत्या स्वरूपाचे तांत्रिक प्रशिक्षण 
द्यायचे हे निश्चित करतानाच विद्यापीठांमधून याविषयीचा अभ्यासक्रम सुरू करता येणो 
शक्य आहे का, याबाबत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी  सांगितले. भाई जगताप, दीपक सावंत, हेमंत टकले, जयंत पाटील, आशिष शेलार आदींनी उपप्रश्न विचारले. (प्रतिनिधी)
 
किना:यावर पोलीस ठाणी 
च्राज्यात 72क् किलोमीटरच्या किनारपट्टीवर ज्या ठिकाणी पर्यटक येतात त्याठिकाणी टप्प्याटप्प्याने पोलीस ठाणी निर्माण केली जातील, असेही गृहमंत्री पाटील यांनी अन्य एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 
च्अलिबाग ते मुरूड दरम्यान 11 किनारपट्टय़ा पर्यटनासाठी वापरल्या जातात. त्यापैकी नागाव, अलिबाग, किहीम अशा चार ठिकाणी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात. याठिकाणी पोलीसठाणी उभारावी अशी मागणी शे.का. पक्षाचे जयंत पाटील यांनी केली. प्रकाश बिनसाळे यांनी मूळ प्रश्न विचारला होता. नीलम गो:हे, भाई जगताप आदींनी उपप्रश्न विचारले.
 
व्हिसेरा तपासणीसाठी कालबद्ध कार्यक्रम तपासणीशिवाय जास्त काळ व्हिसेरा पडून राहिल्यास बाद होतो, हे लक्षात घेऊन व्हिसेरा तपासण्यासाठी कंत्नाटी पद्धतीचा वापर करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल, असे आश्वासन आर. आर. पाटील यांनी आणखी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. भाई जगताप यांनी यासंबंधीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

Web Title: Globalization of Police Status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.