मुंबई : महाराष्ट्र हे देशात विविध क्षेत्रंमध्ये अव्वल असे राज्य असल्याचे आमच्या सरकारने सप्रमाण आणि वारंवार सिद्ध केले आहे. आता त्यापुढे जाऊन हे राज्य जगाच्या स्पर्धेत कसे उतरले आणि यशस्वी होईल, या दृष्टीने निवडणूक जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय पक्षाच्या जाहीरनामा समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला.
समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, माजी अध्यक्ष रणजित देशमुख, दिलीप देशमुख, अ.भा.युवक काँग्रेसचे अध्यक्ष खा.राजीव सातव आदी 25 जण उपस्थित होते.
जाहीरनाम्याचे स्वरूप ग्लोबल असावे, या दृष्टीने सर्व सदस्यांनी येत्या चार-पाच दिवसांत किमान दोन सूचना कराव्यात, असे सांगण्यात आले. राज्यात गेले 15 वर्षे आघाडी सरकार सत्तेमध्ये आहे. त्यामुळे ‘अँटिइन्कम्बन्सी’चा त्रस काँग्रेस-राष्ट्रवादीला होऊ शकतो. अशावेळी सरकारने जनहिताची केलेली कामे आणि राज्याला जागतिक पातळीवर नेण्याचा इरादा जाहीरनाम्यात प्रतिबिंबित होणो अपेक्षित असल्याचे सूत्रंनी सांगितले. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील प्रसिद्धी समितीची बैठकही आज झाली. आघाडी सरकारविरुद्धच्या अपप्रचाराला सडेतोड प्रत्युउत्तर देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)
राज्यातील मागासवर्गीय, अल्पसंख्याकांच्या इच्छा-आकांक्षा, तरुणाईसाठी विशेष कार्यक्रम, विविध घटकांची स्पर्धात्मकता वाढण्यासाठीच्या उपाययोजना, जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठीची पावले याचे प्रतिबिंब पक्षाच्या जाहीरनाम्यात असेल.