शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात तरी एफआरपी वेळेत द्यावी : मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 18:28 IST

शुगर केन कंट्रोल ऱ्यां  ऊस उत्पादकांना गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देगाळप सुरु होऊन दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या हाती पैसे नाहीत शेतकऱ्यांची थकबाकी असतानाही जवळपास ६३ साखर कारखाने विना परवाना सुरु राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून शेती व शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती

पुणे : गाळप हंगाम सुरु होऊन दोन महिने उलटल्यानंतरही राज्यातील ऊस उत्पादक शेतकयांना बहुतांश कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम दिलेली नाही. काही कारखान्यांची मागील काही वर्षांची एफआरपी देखील थकीत आहे. यावर्षी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. अशा अडचणीच्या काळात तरी शेतकऱ्यांना वेळेवर उसाची रक्कम मिळावी अशी मागणी राज्याच्या ऊस दर नियामक मंडळाचे सदस्य विठ्ठल पवार, शिवानंद दरेकर यांनी केली आहे. शुगर केन कंट्रोल ऱ्यां  ऊस उत्पादकांना गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. राज्यातील अनेक कारखाने त्याचे पालन करताना दिसत नाही. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलाला असून शेती व शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे. काही बँका आणि कारखाने देखील ऊस बिलातून वीज बिल आणि बँक थकबाकीची कपात करीत आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कोणतीही कपात करु नये, सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा करावी, याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची थकबाकी असतानाही जवळपास ६३ साखर कारखाने विना परवाना सुरु आहेत. तर, काही साखर कारखान्यांचे चेअरमन, अध्यक्ष, एमडी यांनी चुकीची कागदपत्रे सादर करुन गाळप परवाने मिळवलेले आहेत, याची चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. अनेक साखर कारखान्यांचे वजन काटे सदोष आहेत. मात्र, साखर आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाच्या भरारी पथकामार्फत प्रभावी कारवाई केली जात नाही. या शिवाय गेल्या आठ ते नऊ वर्षांपासुन थकबाकीदार असलेल्या कारखान्यांचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, सहकारमंत्री, ऊस दर नियामक आयोगाकडे करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार