‘व्हर्च्युअल’ मैत्रीला द्या ब्रेक!
By Admin | Updated: August 7, 2016 02:16 IST2016-08-07T02:16:53+5:302016-08-07T02:16:53+5:30
आजकालच्या ‘स्मार्ट’ जमान्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे तसे दुर्मीळच, पण आता हीच तरुणाई नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सध्या इंटरनेटवर ‘व्हर्च्युअल फ्रेंड्स’च्या शोधात आहेत.

‘व्हर्च्युअल’ मैत्रीला द्या ब्रेक!
- स्नेहा मोरे
आजकालच्या ‘स्मार्ट’ जमान्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे तसे दुर्मीळच, पण आता हीच तरुणाई नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सध्या इंटरनेटवर ‘व्हर्च्युअल फ्रेंड्स’च्या शोधात आहेत. हल्ली मेलबॉक्समध्ये फ्रेंडशिपसाठी रिक्वेस्ट येण्याचा ओघही वाढला आहे. या माध्यमातून आपली ओळखपाळख नसणाऱ्या व्यक्तीशी गप्पा मारायच्या, मैत्री करायचा ट्रेंड इन आहे, परंतु ही ‘व्हर्च्युअल मैत्री’त फसवणूक अधिक दिसून येत आहे.
स्मार्ट फोन्स हातात आले आणि मग खऱ्याखुऱ्या जगापासून, माणसांपासून दुरावत गेलो. कॉलेजमधल्या फ्रेंड्सशी व्हॉट्सअॅपवर बोलणे, कट्ट्यावरच्या मित्र-मैत्रिणींचा नवा ग्रुप बनविणे या सगळ््यामुळे संवाद हरवत गेला आणि मग सगळ््याच कृत्रिम जगण्याची गरज भासू लागली. यामुळेच खऱ्याखुऱ्या नात्यांची जागा व्हर्च्युअल जगाने घेतली. दिवसागणिक इंटरनेटवरील या साइट्सने तरुणाईच्या मनात घर केले. मात्र, या माध्यमातून घडणारे गुन्हे, फसवणूक हे प्रकारही तितकेच वाढले आहेत. आपण न पाहिलेल्या व्यक्तीशी रात्रंदिवस बोलणे, त्या व्यक्तीच्या मेसेजची वाट पाहणे, कमी काळाच्या साइटवरच्या ओळखीत स्वत:च्या खासगी गोष्टी शेअर या सगळ््यात फसवणूक होण्याचे प्रमाणच जास्त आहे. केवळ सोबत हवी म्हणून अशा इंटरनेटवरील साइट्सना भुलणे तरुणाईने टाळले पाहिजे.
इंटरनेटवरील या व्हर्च्युअल साइट्सची विश्वासार्हता लक्षात घेऊन तरुणाईने अधिक सजग झाले पाहिजे. केवळ तंत्रज्ञानाच्या विश्वाला वाहून न जाता, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तिंशी संवाद साधणे यावर उत्तम उपाय आहे. खऱ्याखुऱ्या मित्र-मैत्रिणींशी ‘व्हर्च्युअल’ गप्पांपेक्षा बिझी शेड्युल्डमधून वेळ काढून ठरवून मित्र-मैत्रिणींना जाऊन भेटा, त्यांच्याशी बोला. खूप दिवसांपासून साचलेले शेअरिंग आणि केअरिंगच्या भावना व्यक्त होऊ झाल्या की मोकळे वाटेल. तळहातावरच्या ‘क्लिक’पाशी सामावलेल्या या जगापासून थोडे दूर जाऊन पाहा. या फ्रेंडशिप डेच्या तरुणाईने नव्याने निश्चय करा. व्हॉट्सअॅप असो वा हाइक, फेसबुक असो वा इतर फ्रेंडशिप साइट्स या सगळ््या ‘टेकवर्ल्ड’पासून ब्रेक घ्या. यंदाचा फ्रेंडशिप डे हटके पद्धतीने साजरा करा. शाळा, चाळीतल्या आणि कॉलेजमधल्या सगळ््या मित्र-मैत्रिणींना आवर्जून भेटा, डोळ््यांतून पाणी येईपर्यंत हसा...आणि हसता-हसता रडा... या मित्र-मैत्रिणींच्या साथीने हा फ्रेंडशिप डे अविस्मरणीय करा.