शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या पक्ष्यांना तुम्हीही द्या...चारा, पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 03:16 IST

राज्यभर उन्हाचा ताप; पक्षिमित्र संघटना, संस्थांच्या कामांना हातभार लावण्याचे नागरिकांना आवाहन

निशांत वानखेडेनागपूर : उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत असताना पशुपक्ष्यांची काय दयनीय अवस्था होत असेल? अन्नपाण्यावाचून अनेक पक्षी तडफडताना दिसत आहे. त्यांच्यासाठी दाणापाण्याची व्यवस्था करण्याची हीच वेळ आहे. याने अनेक पक्ष्यांना जीवदान मिळणार आहे.विविध पक्षिमित्र संस्था, संघटना आणि निसर्गावर प्रेम करणारे काही संवेदनशील नागरिकांनी पक्ष्यांच्या घासपाण्यासाठी धडपडत आहेतच; परंतु त्यांच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी हजारो हात पुढे येण्याची आज गरज आहे.

गावखेड्यांमध्ये घराबाहेर पाणी ठेवलेले असायचे. राहिलेले अन्न अंगणात टाकल्यानंतर चिमण्या, बुलबुल अशा पक्ष्यांना ते खायला मिळायचे. शहरातील बंदिस्त घरात हे शक्य होत नाही. परंतु घराच्या गच्ची किंवा खिडक्यांमध्ये पक्ष्यांसाठी पाणी तसेच अन्न ठेवल्यास पक्ष्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. घरातच नाही तर आपल्या फिरण्याच्या जागा येथील झाडांवर, झाडाखाली अन्नपाण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. तुम्ही कामानिमित्त जिथे-जिथे जाता तिथे हे करणे शक्य आहे. हे चिमुकले प्रयत्न अन्न पाण्यासाठी तडफडणाऱ्या पक्ष्यांचे जीव वाचवू शकतात.

पाचोळा जाळू नकाउन्हाळ्याच्या दिवसात झाडांची पानगळ होत असते. हा पालापाचोळा झाडाखाली साचून असतो. पालापाचोळ्याखाली किडे, गांडूळ तयार होतात. ते खाण्यासाठी पक्ष्यांना मेजवानी असते. बºयाच वेळा हा कचरा झाडून जाळला जातो. पण हा कचरा जाळू नका व शक्यतो एका ठिकाणी जमा करून ठेवा, असे आवाहन पक्षिमित्रांनी केले आहे. एकतर धुरामुळे प्रदूषण होते शिवाय पक्ष्यांनाही ते त्रासदायक होते. या कचऱ्याखाली मिळणाऱ्या नैसर्गिक खाद्यापासून पक्षी वंचित राहतात.

घरी अशी करा व्यवस्था(पक्षीमित्र, अभ्यासक अविनाश लोंढे यांच्या काही मार्गदर्शक सूचना)

  • घरी सावलीच्या ठिकाणी व पक्ष्यांना मुक्त वातावरण मिळेल अशा ठिकाणी मातीच्या पसरट भांड्यात पाणी ठेवावे. पक्ष्यांना आंघोळही करता येईल, असे भांडे असावे.
  • पाण्यासोबतच अन्नाची व्यवस्थाही करता येईल. विशेषत: ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आदी धान्याचा भरडा उत्तम ठरेल. यासह भाताचे शित व पोळ्यांचे बारीक तुकडे करून ठेवता येतील.
  • पाणी आणि धान्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या, बरण्या, तार, दोरी, मातीचे भांडे आदींचा वापर करून फीडर तयार करता येईल. असे कृत्रिम फीडर आता बाजारातही उपलब्ध आहेत.
  • उद्यानातील प्रत्येक झाडावर पाणी व धान्याची व्यवस्था करता येईल.
  • झाडांच्या फांद्यांना धरून किंवा दोन खोडांच्या मध्ये असे पाण्याचे पात्र दोरीच्या मदतीने अडकविले जाऊ शकते.
  • मातीचे पात्र बांधणे शक्य नसेल तर नारळाच्या करवंटीचा वापर केला जाऊ शकतो.
  • झाडावर बांधणे शक्य नसेल तर झाडाखाली, झुडपात सावली राहील तिथे पाणी व धान्य ठेवावे.
  • उद्यानात जाता-येताना आवर्जून सोबत पाणी घेऊन जा आणि झाडांना टांगलेल्या पात्रात ओता. घरून बाहेर निघताना सोबत पाणी ठेवा जेणेकरून शक्य होईल त्या पात्रात पाणी भरता येईल.
  • जिथे पाण्याची व्यवस्था नाही अशा प्रत्येक ठिकाणी ज्यांना शक्य होईल त्यांनी पाण्याची व्यवस्था करावी.
टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यHeat Strokeउष्माघातWaterपाणी