शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

३५०० रुपये भाव द्या, मगच धुराडे पेटवा : रघुनाथ पाटील, सुकाणू समितीच्या पंढरपुरातील शेतकरी परिषदेत आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 12:59 IST

पंढरपूर दि ७ : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला त्वरित प्रति मे़ टन ५०० रुपयांचा हप्ता आणि आगामी हंगामासाठी उसाचा पहिला हप्ता प्रति मे़ टन ३५०० रुपये जाहीर करावा, मगच धुराडे पेटवा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतला़

ठळक मुद्देआता शेतकरी विरुद्ध सरकार लढाई सुरू २०१९ साल उजाडल्याशिवाय शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही़भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ७ : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला त्वरित प्रति मे़ टन ५०० रुपयांचा हप्ता आणि आगामी हंगामासाठी उसाचा पहिला हप्ता प्रति मे़ टन ३५०० रुपये जाहीर करावा, मगच धुराडे पेटवा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतला़पंढरपुरातील संत तुकाराम भवन येथे शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने घेतलेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत ते बोलत होते़ व्यासपीठावर सुकाणू समितीचे सदस्य बाबा आढाव, संजय पाटील-घाटणेकर, पंजाबराव पाटील, बी़ जी़ पाटील, डॉ़ अजित नवले, किशोर ढमाले, करण गायकर, गणेश जगताप, गणेश कदम, सुशीला मोराळे, माऊली पवार, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, माऊली हळणवर आदी उपस्थित होते़शेतकºयांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे असे सांगून रघुनाथ पाटील म्हणाले, आता शेतकरी विरुद्ध सरकार अशी लढाई सुरू झाली आहे़ सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे़ आॅनलाईन कर्जमाफी अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर दिली आहे़ पण पुन्हा तारीख वाढण्याची शक्यता आहे़ कारण सध्या सर्व्हर डाऊन होत असल्याच्या तक्रारी आहेत़ त्यानंतर १ आॅक्टोबर रोजी कर्जदार शेतकºयांची खरी आकडेवारी समोर येईल़ त्यानंतर संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल़ २०१९ साल उजाडल्याशिवाय शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही़ कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकीय षडयंत्र आहे़ आता खरीप हंगाम गेला़ दिवाळीनंतर रब्बी हंगाम येईल तरीही शेतकºयांना कर्ज मिळणार नाही़ केवळ शेतकºयांना अडचणीत ठेवण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़याप्रसंगी सुकाणू समितीचे सदस्य संजय पाटील- घाटणेकर, डॉ़ अजित नवले, माऊली पवार, सुशीला मोराळे यांनी भाषणातून शेतकºयांच्या समस्या मांडत सरकारवर जोरदार टीका केली़ शिवाय २६ सप्टेंबर रोजी जळगाव येथे होत असलेल्या शेतकरी परिषदेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले़------------------------भाजपाचा सरपंच नकोलोकसभा, विधानसभेत आघाडी सरकार नको म्हणून युतीला निवडून दिले़ त्यांनीही निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही़ शेतकºयांची तर निव्वळ फसवणूक केली़ नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये मिळालेल्या यशाने भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे; मात्र आता त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे़ आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा एकही सरपंच होणार नाही याची काळजी शेतकºयांनी घेतली पाहिजे़ या निवडणुकीत भाजपाचा पराभव झालाच पाहिजे, असे आवाहन रघुनाथ पाटील यांनी केले़