10 हजार कोटींचे पॅकेज द्या

By Admin | Updated: December 11, 2014 01:32 IST2014-12-11T01:32:46+5:302014-12-11T01:32:46+5:30

शेतक:यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, शेतक:यांचे पीक कर्ज व वीज बिल माफ करून त्यांना नवीन कर्जासाठी पात्र ठरवावे.

Give package of 10 thousand crores | 10 हजार कोटींचे पॅकेज द्या

10 हजार कोटींचे पॅकेज द्या

विरोधकांचा विधानसभेत हल्लाबोल : बोलले तसे वागण्याचा आग्रह 
नागपूर : अधिवेशनाच्या तिस:या दिवशी दुष्काळावरील चर्चेला सुरुवात झाली. चर्चेत गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारने केलेल्या नियोजनशून्य कारभारामुळे, पॅकेजमध्ये केलेल्या घोटाळ्यांमुळे ही वेळ आल्याचे खापर सत्ताधा:यांनी फोडले. तर,  आजवर भाजप-सेनेचे नेते ज्या मागण्या करीत होते, त्यांनी त्याच पूर्ण कराव्यात. बोलले तसे वागावे, असा सल्ला विरोधकांनी सत्ताधा:यांना देत त्यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 
 
शेतक:यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, शेतक:यांचे पीक कर्ज व वीज बिल माफ करून त्यांना नवीन कर्जासाठी पात्र ठरवावे. आत्महत्याग्रस्त शेतक:याच्या विधवेला पेन्शन सुरू करावी व त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा भार सरकारने उचलावा, अशा मागण्या विरोधकांनी लावून धरल्या. तुम्ही मदतीत कमी पडलात तर आम्ही विरोधात कमी पडणार नाही, असा इशाराही सरकारला देण्यात आला. सत्ताधारी आमदारांनीही दुष्काळ असल्याची कबुली दिली. सरकार उपाय योजेल असा दावा करीत पॅकेजची मागणी करणो मात्र टाळले. 
      विरोधकांनी दिलेला प्रस्ताव न स्वीकारता सत्तापक्षाने नियम 293 नुसार दिलेल्या प्रस्तावानुसार दुष्काळावर चर्चा घेण्यात आली. चर्चेत विरोधी पक्षातर्फे अजित पवार, पतंगराव कदम, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गणपतराव देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली. 
चर्चेला सुरुवात करताना आ. चैनसुख संचेती यांनी दुष्काळी परिस्थितीसाठी आघाडी सरकारची चुकीची धोरणो जबाबदार असल्याची टीका केली. आघाडी सरकारने विविध पॅकेज दिले पण ते शेतक:यांर्पयत पोहचलेच नाही. पंचनामे न केल्यामुळे, नावातील चुका दुरुस्त न केल्यामुळे शेकडो शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचे सांगितले. फडणवीस सरकारने अंतिम आणोवारीची वाट न पाहता शेतकरी हितासाठी 4क् हजार पैकी 19 हजार गावे टंचाईग्रस्त जाहीर केल्याचे सांगत त्यांनी सरकारची बाजू मांडली. 
फडणवीसांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या 
मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर एक महिन्यात सर्वाधिक आत्महत्या या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झाल्या आहेत. मराठवाडय़ात तर एका महिन्यात 4क्क् आत्महत्या झाल्या आहेत, असा दावा पवार यांनी केला. मराठवाडय़ाला विशेष पॅकेज देण्याची मागणी त्यांनी केली. 
‘धरणा’वरून दादा भडकले 
शिवसेना सत्तेत सहभागी झाली नसताना शिवसेना नेत्यांनी केलेली व वर्तमानपत्रत प्रसिद्ध झालेली वक्तव्ये त्यांनी वाचून दाखवित असताना सत्तापक्षात बसलेले योगेश सागर यांनी ‘धरणात पाणी कुठून आले’ ते सांगा, असा टोमणा मारला. यावर दादा चांगलेच भडकले. तुम्हाला मुंबईत राहून दुष्काळ काय कळणार. बसून का बोलता हिंमत असेल तर उभे राहून बोला. आम्ही जे चुकीचे बोललो त्याची शिक्षा भोगली आहे. आता तेच ते परत परत काढू नका. सत्तेत बसून खूप जोर मारत आहात. 2क्-25 तर आमचेच बगलबच्चे तिकडे येऊन बसलेले आहेत. आम्हाला फोन करून सांगतात, दादा इकडे करमत नाही, असेही त्यांनी सुनावले. 
केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावरून कोंडी 
- लोकसभेत खा. अशोक चव्हाण व खा. सुप्रिया सुळे यांनी दुष्काळाचा प्रश्न प्रभावीपणो मांडला असता त्यावर उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारने अद्याप दुष्काळच जाहीर केलेला नाही, तर मदत कशी करणार, असा खुलासा केल्याचा मुद्दा उपस्थित करीत अजित पवार, छगन भुजबळ, पतंगराव कदम, गणपतराव देशमुख आदींनी राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्र्यांनी एकप्रकारे महाराष्ट्राची अब्रु काढली आहे. यावर राज्य सरकारने खुलासा करावा, अशी मागणीही लावून धरण्यात आली. 
राजकीय टोलेबाजी रंगली 
- पवार म्हणाले, भाजपने मराठवाडय़ाला किमान 2 मंत्रिपद दिले. शिवसेनेने मराठवाडय़ावर अन्याय केला आहे. एकही मंत्रिपद दिलेले नाही. अजरुन खोतकर, डॉ. मुंदडा हे अनुभवी नेते आहेत. देसाई साहेब (सुभाष) तुम्ही नशीबवान आहात. निवडून न येता मंत्री झालात, असा चिमटाही त्यांनी काढला. 
 
 
पतंगराव कदम म्हणाले, विरोधी पक्षात असताना हेच नेते मोठमोठय़ा बाता करायचे. काही लोक तर मीडियावाल्यांना सोबतच घेऊन फिरायचे. कॅमे:यासमोर जनावराला पेंडी टाकून फोटो काढायचे.  आता तेच सरकारमध्ये आले असतानाही दुष्काळावर काहीच उपाय योजले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे पिकांचे भाव पडत असल्याचा आरोप करीत राज्य सरकारने त्यावर उपाय योजण्याची मागणी केली. शेकापचे गणपतराव देशमुख यांनी सत्ताधा:यांकडून त्यांनी विरोधक असताना केलेल्या मागण्यांची 5क् टक्के तरी पूर्तता करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 
 
काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनीही आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी यवतमाळच्या प्रचारसभेत सोयाबीनला भाव व 5क् टक्के अतिरिक्त नफा देण्याची घोषणा केली होती. पण गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनचे भाव दोन हजारांनी घटले आहेत. कोरडवाहू शेतक:याला हेक्टरी 25 हजार रुपये व ओलिताला 5क् हजार रुपयांची मदत द्यावी, तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबाला पाच लाखांची मदत व एकाला शासकीय नोकरी देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. 
 
पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर अजित पवार, छगन भुजबळ यांनी नेम साधला. पवार म्हणाले, मनासारखे मंत्रिमंडळात जायला मिळाले पण खाते फडतूस मिळाले. यावर कदम यांनी आक्षेप घेतला असता पवार यांनी खडतूस शब्द मागे घेत किरकोळ व दुय्यम खाती दिल्याचे सांगितले. यावर कदम भडकले. तुमच्या मंत्रिमंडळात कोणत्या मंत्र्यांकडे फडतूस खाते होते ते सांगा, असा सवाल पवारांना केला. दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ नोकझोक सुरू राहिली. यानंतर भुजबळ यांनीही सत्तेत सहभागी होण्यापूर्वी कदम यांची ‘सामना’त आलेली  वक्तव्ये वाचून दाखविली. 25 हजार कोटींचे पॅकेज द्या, अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही, असे कदम म्हणाले होते. आता ते सत्तेत गेले असले तरी परिस्थिती बदललेली नाही. मी पॅकेजची वाट पाहत आहे, असा टोला त्यांनी कदम यांना लगावला. त्यावर कदम यांनीही सत्तेत असलो तरी शेतक:यांमध्ये जाणार असल्याचे सांगितले. 
 
अजित पवार यांनी सभागृहात सोयाबीन व कापसाचे झाड दाखवित पिकांची अशी वाईट स्थिती झाली असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारसभांमध्ये मोठमोठय़ा घोषणा केल्या. आता कापूस, धनाला फक्त 5क् रुपये भाववाढ दिली. जे शेतकरी संघटनेत आंदोलन करायचे ते आता सत्तेत असल्यामुळे बोलायला तयार नाहीत, अशी टीका करीत नक्की कुणाचे ‘अच्छे दिन’ आलेत, असा सवाल त्यांनी केला.
 
 
 

 

Web Title: Give package of 10 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.