शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

...फक्त 20 मिनिटं वेळ द्या, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंचं नामदेव शास्त्रींना भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 18:34 IST

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे असतानाच आता पंकजांनीही नामदेव शास्त्रींना भावनिक साद घातली आहे.

मुंबई - दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे असतानाच आता पंकजांनीही नामदेव शास्त्रींना भावनिक साद घातली आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्रींना पत्र लिहून 20 मिनिटांचा वेळ मागितला आहे.या पत्रात पंकजा मुंडे लिहितात, आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते. लोकांची तळमळ पाहून कोणी मध्यस्थी नको म्हणून मीच विनंती करते, शेवटी मी लहानच आहे. मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा. काही नको त्यांना फक्त 20 मिनिटं वेळ वर्षातून द्या. ते पुन्हा कोयता घेऊन राबायला जातील, त्यांना ऊर्जा मिळते. मी आतापर्यंत कोणापुढे झुकले नाही, मात्र समाजासाठी नतमस्तक होते. मला दिवाळीची माहेरची भेट द्या. पंकजा मुंडेंचं हे भावनिक पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथे झालेल्या दसरा मेळावा कृती समितीच्या बैठकीत पंकजा मुंडे समर्थकांनी महंत शास्त्री यांच्या ‘सुपारी’ची भाषा वापरली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. भगवान गडावर दस-याच्या दिवशी कोणताही राजकीय मेळावा होणार नाही, अशी ठाम भूमिका नामदेव शास्त्री यांनी घेतली होती. शास्त्री यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन गडावर राजकीय मेळाव्याला बंदी घालण्याची मागणीही केली होती. या पार्श्वभूमीवर मुंडे समर्थकांचा गडावरच मेळावा घेण्याचा आग्रह आहे. दसरा मेळावा कृती समिती स्थापन झाली असून, गावोगावी बैठका सुरू आहेत. पाथर्डी येथे बैठकीत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्याने महंत नामदेव शास्त्री यांच्याविरुद्ध सुपारीची भाषा वापरली होती. तो व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोन दिवसांपूर्वी गडावर अज्ञात लोकांचा वावर दिसल्याने पोलिसांनी गडावर बंदोबस्त वाढवला आहे. श्रीक्षेत्र भगवानगड हे सर्व जाती-धर्माच्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तेथील भक्तांच्या भावना लक्षात घेता गडावर किंवा गडाच्या जागेत कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या भाषणास किंवा राजकीय सभेस परवानगी देऊ नये, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केलीय.भगवानगड हे आमचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भाविकांना राजकीय भाषणांचा मेळावा नको आहे. मागील वर्षी याच कारणावरून हाणामा-या झालेल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती आता नको. याशिवाय कोणालाही उपोषणास बसण्याची परवानगी देऊ नये. महंतांची व गडाची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,याची काळजी प्रशासनाने घ्यावी व राजकीय सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी खरवंडी कासार, मालेवाडी, ढाकणवाडी, काटेवाडी, मिडसांगवी, भारजवाडी, कीर्तनवाडी, पिंपळगव्हाण आदी गावांतील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे