१० दिवसांत दाभोलकरांच्या हत्या तपासाचा तपशील द्या - हमीद दाभोलकर

By Admin | Updated: July 26, 2014 12:18 IST2014-07-26T12:14:26+5:302014-07-26T12:18:29+5:30

येत्या दहा दिवसात दाभोलकरांच्या हत्या तपासाचा तपशील द्यावा अन्यथा 'अंनिस'चे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करतील असा इशारा हमीद दाभोलकर यांनी सरकारला दिला आहे

Give details of the murder of Dabholkar in 10 days - Hameed Dabholkar | १० दिवसांत दाभोलकरांच्या हत्या तपासाचा तपशील द्या - हमीद दाभोलकर

१० दिवसांत दाभोलकरांच्या हत्या तपासाचा तपशील द्या - हमीद दाभोलकर

ऑनलाइन टीम

पुणे, दि. २६ - येत्या दहा दिवसात दाभोलकरांच्या हत्या तपासाचा तपशील द्यावा अन्यथा 'अंनिस'चे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करतील असा इशारा हमीद दाभोलकर यांनी सरकारला दिला आहे.  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होणार असून अद्याप त्यांच्या मारेक-यांचा शोध लागलेला नाही. ही बाब दुर्दैवी असल्याचे सांगत सरकारच्या, गृहमंत्र्यांच्या आश्वासनांवर विश्वास नसल्याचेही त्यांनी सांगितले. २० ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शांतता आंदोलन करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गेल्या वर्षी २० ऑगस्ट रोजी पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

Web Title: Give details of the murder of Dabholkar in 10 days - Hameed Dabholkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.