पुनर्वसित बांगलादेशींना जात प्रमाणपत्र देणार
By Admin | Updated: September 8, 2016 05:50 IST2016-09-08T05:50:28+5:302016-09-08T05:50:28+5:30
बांगलादेशातून थेट महाराष्ट्रात पुनर्वसित झालेल्यांना इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

पुनर्वसित बांगलादेशींना जात प्रमाणपत्र देणार
मुंबई : बांगलादेशातून थेट महाराष्ट्रात पुनर्वसित झालेल्यांना इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.
बैठकीस गडचिरोलीचे खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी आणि इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. बांगलादेशमधून महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया यासारख्या जिल्ह्यांमध्ये रेफ्युजी म्हणून (निर्वासित) आलेल्यांना जात प्रमाणपत्र देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)