‘अल्पसंख्य समाजांनाही ५ टक्के आरक्षण द्या’
By Admin | Updated: October 20, 2016 05:58 IST2016-10-20T05:58:21+5:302016-10-20T05:58:21+5:30
जैन, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठीही ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र गुजरात समाज महामंडळाचे अध्यक्ष हेमराज शाह यांनी केली

‘अल्पसंख्य समाजांनाही ५ टक्के आरक्षण द्या’
मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची ठाम भूमिका घेतली असताना, अल्पसंख्य समाजातील जैन, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठीही ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र गुजरात समाज
महामंडळाचे अध्यक्ष हेमराज शाह यांनी केली आहे.
अल्पसंख्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक व राजगार यांत
सवलती देणे आणि त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती करणे, हे राज्य सरकारचे कर्तव्य आहेत.
त्यामुळे अल्पसंख्य समाजाने संघटीत व्हावे आणि सनदशीर मार्गाने सरकारवर दबाव आणावाण असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अर्थात या घटकांना आरक्षण देताना,
अन्य घटकांचे आरक्षण कमी
करू नये, असेही त्यांनी स्पष्ट
केले आहे. (प्रतिनिधी)