शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

‘सिंचनासाठी २५ हजार कोटी द्या’

By admin | Updated: March 10, 2016 03:55 IST

राज्यातील १४ दुष्काळी जिल्हे आणि १७९ अवर्षणप्रवण तालुक्यांमधील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २५ हजार कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.

मुंबई : राज्यातील १४ दुष्काळी जिल्हे आणि १७९ अवर्षणप्रवण तालुक्यांमधील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २५ हजार कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास ७० हजार कोटी रुपयांची गरज भासणार असून दुष्काळी आणि अवर्षणप्रवण तालुक्यांमधील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २५ हजार कोटी रुपये राज्याला द्यावेत, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतला ही माहिती दिली. कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्यासाठी आवश्यक असलेल्या कृष्णा-मराठवाडा स्थिरीकरण योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, माळढोक अभयारण्यामुळे अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूर केला आहे. जलसंपदा विभागासाठी दरवर्षी होणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीला २५ ते ३० टक्क्यांचा कट लावला जातो, असा अनुभव आहे. यंदा मात्र, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ७ हजार २७२ कोटी रुपये अधिक ५०० कोटी अशा एकूण ७ हजार ७७२ कोटी रुपयांचा निधी पूर्णत: वितरित केला आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या संनियंत्रण समितीमध्ये गिरीश महाजन यांना सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.दरम्यान, विदर्भ आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील तापी मेगा रिचार्ज योजनेला केंद्राने मंजुरी दिली आहे. या अंतर्गत अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा भागात आणि बालाघाट जिल्ह्यात सिंचन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या शिवाय, धुळे जिल्ह्यातील सुरवाडे-जामफळ उपसा सिंचन योजनेलाही केंद्रीय जल आयोगाने तांत्रिक मान्यता दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)