शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

११ हजार द्या! ग्रामपंचायतीचे प्रशासकपद राष्ट्रवादीने काढले विकायला; जिल्हाध्यक्षांचे पत्र झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 11:26 PM

राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना त्यासंबंधी १४ जुलैला पत्र पाठवून असे प्रशासक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ११ हजार रुपयांची बिनपरतीची ठेव पक्षनिधी म्हणून घेण्याचे सुचविले आहे.

- विश्वास पाटील 

कोल्हापूर : राज्यातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करून त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निधी उभा करीत असल्याचे प्रकरण गुरुवारी पुढे आले.

राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना त्यासंबंधी १४ जुलैला पत्र पाठवून असे प्रशासक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ११ हजार रुपयांची बिनपरतीची ठेव पक्षनिधी म्हणून घेण्याचे सुचविले आहे. त्यातून राष्ट्रवादी कॉँग्रेस वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहे. त्याच पक्षाचे नेते हसन मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री आहेत.गारटकर पत्रात म्हणतात, पुणे जिल्ह्यात १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत सरपंचपदाची मुदत संपलेल्या तब्बल ७५० ग्रामपंचायती आहेत.

या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. तिची प्रक्रिया राबविण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबद्दल मार्गदर्शक सूचनाही शासनाने घालून दिल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करीत सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये संबंधित उमेदवारांकडून अर्ज भरून घ्यावा व त्यासोबत त्याच्याकडून पक्षनिधी म्हणून बिनपरतीचा ११ हजारांचा निधी घ्यावा व हा निधी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खात्यामध्ये जमा करावा व त्याची पावती अर्जांसोबत जोडून ते सर्व अर्ज तालुकाध्यक्षांनी तारीखनिहाय २० जुलैपर्यंत जिल्हाध्यक्षांकडे दोन प्रतींत सादर करावेत.

यासोबत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खाते क्रमांक (१७१६००१७००००४२९७) आणि आयएफएससी कोडही देण्यात आला आहे. हा निधी सर्वच इच्छुक उमेदवारांकडून घेतला जाणार आणि निवड मात्र एकाच व्यक्तीची होणार, हे स्पष्टच आहे. त्याने खिशातील पैसे घालून हे पद मिळवावे आणि प्रशासक झाल्यावर ग्रामपंचायतीच्या कारभारातून ते पैसे काढावेत की काय, अशी विचारणा काही ज्येष्ठ सरपंचांनी केली.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसHasan Mushrifहसन मुश्रीफ