सारोळा पुलावरून उडी घेऊन तरुणीची आत्महत्या

By Admin | Updated: April 3, 2017 21:30 IST2017-04-03T21:30:27+5:302017-04-03T21:30:27+5:30

पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावरून खंडाळा तालुक्यातील भोई येथील महाविद्यालयीन युवतीने उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार

The girl's suicide by taking a plunge from Sarola bridge | सारोळा पुलावरून उडी घेऊन तरुणीची आत्महत्या

सारोळा पुलावरून उडी घेऊन तरुणीची आत्महत्या

>आॅनलाईन लोकमत
शिरवळ (सातारा) : पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावरून खंडाळा तालुक्यातील भोई येथील महाविद्यालयीन युवतीने उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. पाण्याचा तीव्र प्रवाह व अंधार यामुळे शोधकार्यात व्यत्यय येत आहे. प्रतीक्षा अनिल शिर्के (वय २०) असे संबंधित तरुणीचे नाव आहे.
 
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ येथील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या दुस-या वर्षात प्रतीक्षा शिर्के ही शिकत होती. प्रतीक्षा ही सोमवारी दुपारी पेपर दिल्यापासून अस्वस्थ होती. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास प्रतीक्षा शिर्के ही सारोळा पुलावर आली.  प्रतीक्षाने साताºयाकडून पुण्याकडे जाणाºया नवीन पुलावरून मध्यभागी उभे राहून नदीत उडी घेतली. 
यावेळी पाण्यात मोठा आवाज झाल्याने मच्छीमारी व तेथील नागरिकांनी तातडीने शिरवळ पोलिस ठाण्यात माहिती दिली.
 
त्यानंतर पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे, पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार, हवालदार रत्नसिंह सोनवलकर, दत्तात्रय धायगुडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. एच. भोईटे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. मात्र, पाण्याचा तीव्र प्रवाह व अंधारामुळे शोधकार्यात अडथळा येत होता.
 
 

Web Title: The girl's suicide by taking a plunge from Sarola bridge