तरुणीची रुग्णालयात आत्महत्या
By Admin | Updated: July 31, 2016 01:55 IST2016-07-31T01:55:16+5:302016-07-31T01:55:16+5:30
अंबरनाथ पश्चिमेतील आशीर्वाद रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सुवर्णा कांबळे या उच्चशिक्षित तरुणीने रुग्णालयातच आत्महत्या केली.

तरुणीची रुग्णालयात आत्महत्या
अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेतील आशीर्वाद रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सुवर्णा कांबळे या उच्चशिक्षित तरुणीने रुग्णालयातच आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. डॉक्टर असलेल्या स्वाती कांबळे यांची बहीण सुवर्णा कांबळे हिला टायफाइड झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी सकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. (प्रतिनिधी)