मुलींनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती

By Admin | Updated: September 6, 2016 00:56 IST2016-09-06T00:56:13+5:302016-09-06T00:56:13+5:30

मनपा शाळा क्र. ११५मध्ये झाली़ कमल फाउंडेशनचे डॉ़ महावीर खोत यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले

Girls started the Ganesh idol of Shadu | मुलींनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती

मुलींनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती


पुणे : शाडूच्या मातीपासून आकर्षक गणेशमूर्ती तयार करण्याची इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा हिंगणे येथील मनपा शाळा क्र. ११५मध्ये झाली़ कमल फाउंडेशनचे डॉ़ महावीर खोत यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़
या वेळी राखी रासकर म्हणाल्या, ‘‘उत्सवामधून समाजाची सेवा करण्यास प्राधान्य हवे़ पर्यावरणाचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी आहे़ या उत्सवांना विधायक स्वरूप देण्याची गरज आहे़’’
या वेळी मुलींना पर्यावरणरक्षणाची शपथही देण्यात आली़ या कार्यशाळेत मुलींनी शाडूच्या मातीचे आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या़ मुलींनी वसुंधरेची आरती, तसेच वृक्षांची महती सांगणारी गीते सादर केली़
या कार्यक्रमाला उद्योजिका पद्मा गादिया, मेघना झुजम, पर्यावरण क्लबचे अनिल साळवी, शशितारा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रावणी जगताप, मानवी हक्क संघटनेचे राजेंद्र उणेचा, अनुत मिश्रा उपस्थित होते़ शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला पांढरे, सहायक शिक्षणप्रमुख सचिन काळे यांनी मार्गदर्शन केले़
(प्रतिनिधी)

Web Title: Girls started the Ganesh idol of Shadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.