वसतिगृहात मुलींचे सीसीटीव्हीने चित्रीकरण
By Admin | Updated: December 27, 2015 00:33 IST2015-12-27T00:33:56+5:302015-12-27T00:33:56+5:30
वसतिगृहातील मुलींना कल्पना न देता, त्यांच्या रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून चित्रीकरण केल्याप्रकरणी अमित शिंदे या वसतिगृह मालकास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे .

वसतिगृहात मुलींचे सीसीटीव्हीने चित्रीकरण
पुणे : वसतिगृहातील मुलींना कल्पना न देता, त्यांच्या रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून चित्रीकरण केल्याप्रकरणी अमित शिंदे या वसतिगृह मालकास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे . त्याला शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी एका तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०१५ पासून सुरू होता. आरोपी अमित याचे कोथरूडमध्ये मुलींचे वसतिगृह आहे. फिर्यादी आपल्या मैत्रिणीसह या वसतिगृहात राहाते. कॅमेरे बसविल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली.