कन्या शाळेची इमारत होणार दुमजली
By Admin | Updated: June 8, 2016 02:21 IST2016-06-08T02:21:05+5:302016-06-08T02:21:05+5:30
नेरळ गावामधील शंभर वर्षे जुनी रायगड जिल्हा परिषदेच्या मालकी असलेली शाळा जमीनदोस्त करण्यात येत आहे.

कन्या शाळेची इमारत होणार दुमजली
कर्जत : नेरळ गावामधील शंभर वर्षे जुनी रायगड जिल्हा परिषदेच्या मालकी असलेली शाळा जमीनदोस्त करण्यात येत आहे. गेले वर्षभर ती इमारत नादुरु स्त असल्याने तेथे विद्यार्थी बसत नव्हते, त्यामुळे ती शाळा दोन सत्रात भरविली जात होती. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी त्या शाळेच्या नवीन दुमजली इमारतीसाठी २२ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
नेरळमध्ये कन्या शाळा नावाने जिल्हा परिषदेची शाळा भरविली जाते. गतवर्षी १ जून २०१५ रोजी या शाळेच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्या इमारतीच्या दुरु स्तीच्या मागणीसाठी या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांचा आग्रह होता. कर्जत पंचायत समिती त्या नादुरु स्त इमारतीकडे लक्ष देत नसल्याने पालकांनी आग्रह केल्याने दोन सत्रात वर्ग भरविले जात होते. शतक महोत्सवी वर्षाचा कार्यक्र म करण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी नवीन दुमजली इमारत बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर ना हरकत दाखला प्राप्त होताच रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने चार वर्गखोल्या मंजूर केल्या.
साधारण २२ लाख रु पये खर्चून दुमजली इमारतीमध्ये चार वर्गखोल्या उभारण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून शंभर वर्षे जुनी शाळा जमीनदोस्त करण्याच्या कामास सुरु वात करण्यात आली. ९ जून रोजी दुमजली इमारतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुभाष नाईक यांनी दिली. (वार्ताहर)