शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

गरिबांच्या मुलींची ब्रिटिशकालीन जि.प.ची कन्या शाळा तोडून नामशेष करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 8:59 PM

शहरातील गरीब मुलींसाठी येथील जिल्हा परिषदेची कन्या शाळा ब्रिटीशकालीन आहे. मात्र तिला तोडून येथील विद्यार्थिनी व बी.जे. हायस्कूलचे विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतरित करणार आहे.

ठाणे : शहरातील गरीब मुलींसाठी येथील जिल्हा परिषदेची कन्या शाळा ब्रिटीशकालीन आहे. मात्र तिला तोडून येथील विद्यार्थिनी व बी.जे. हायस्कूलचे विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतरित करणार आहे. मुख्य कार्यकारी विवेक भीमनवार यांनी विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी कन्या शाळे विषयी विचारले असता ही शाळाच सहा महिन्यांच्या कालावधीत तोडणार असल्याचे यावेळी उघड झाले.येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेने पत्रकार परिषद घेऊन कामकाजासह विकासाचा आढावा उघड करण्यात आला. ग्रामीण भागातील सुमारे एक हजार ३६३ शाळा शंभर टक्के डिजिटल केल्याचा दावा करताना ९५० शाळा देखील प्रगत केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यास अनुसरून शहरात असलेली ब्रिटिशकालीन जिल्हा परिषदेची कन्या शाळा डिजिटल का झाली नाही, या विषयी विचारले असता ही शाळा तोंडणार असल्याचे भीमनवार यांच्यासह शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले. शाळा तोडल्यानंतर संबंधित भूखंडाचा वापर कशासाठी करणार, यावर मात्र समाधानकारक उत्तर देता आले नाही. जिल्हा परिषदेत येणा-या लोकप्रतिनिधींची बॉडी या भूखंडाचा काय तो विचार करणार असल्याचे शेंडकर यांनी सांगितले.चांगल्या कामांमुळे राज्यपालांनी पुरस्कृत केलेल्या शेंडकर यांना जिल्हा परिषदेची ही कन्या शाळा ठाणे महापालिकेत वर्ग करण्यात आल्याचा प्रश्न विचारण्यात आला. यावर ‘आम्ही तर काही प्रस्ताव दिलेला नाही ’ असे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळले. शाळेच्या या भूखंडाचा वापर कशासाठी करणार... मुलांना अन्य शाळेत स्थलांतरित करणार... यावरून शाळेचे विद्यार्थी महापालिकेसह अन्य शाळांमध्ये समाविष्ट होणा-या शिक्षणाधिका-यांना याची भनक नसणे योग्य नसल्याचे निदर्शनात आले. महिला व मुलींच्या सबलीकरणासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. पण गरीब, दीन दलितांच्या मुली शिक्षण घेत असलेली कन्या शाळा तोडून हा भूखंड जिल्हा परिषद मोकळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून उघड झाले. ‘लेक शिकवा’ असे शासनाचे उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद ग्रामीण भागाप्रमाणे कन्या शाळेला डिजिटल न करता तिला आगामी सहा महिन्यांत तोडण्याचे नियोजन करीत आहे. यामुळे हक्काच्या शाळेपासून वंचित होणा-या ठाणे शहरातील सावित्रीच्या लेकींना शहरातील महागड्या शाळेत शिकणे शक्य नसल्याचे उघड होत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा करणा-या जिल्हा परिषदेच्या सुमारे दहा शाळा मागील वर्षात बंद पडल्याचे या पत्रकार परिषदेत उघड झाले. विद्यार्थी संख्येअभावी दुस-याजवळच्या तीन किलोमीटरच्या शाळेत या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले. शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी हा कार्यक्रम राबवताना विद्यार्थ्याच्या वाहन व्यवस्थेची देखील काळजी घेतली जात असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. जिल्ह्यात ९५ हजार शौचालये बांधून जिल्हा शंभर टक्के हगणदारीमुक्त होत आहे, नादुरुस्ती शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली, ६५ ग्रामपंचायतींच्या विकासकामांचे आराखडे तयार झाले, गावातील शाळांच्या वीज पुरवठ्याचे बिल भरण्यासह साफसफाई व शौचालयांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर सोपवण्यात आली.घरकूल बांधणीत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून बहुतांशी घरकूल बांधून पूर्ण झाले. विविध करणांनी रखडलेल्या सुमारे १८८ पाणी पुरवठा योजनांचे कामे पूर्ण करण्यात आले. सॅम, मॅमचे बालके कुपोषणातून मुक्त करण्याची प्रगती आदी विविध विषयांची माहिती भीमनवार यांनी देऊन जिल्हा परिषदेच्या प्रगतीचा आढावा पत्रकारांसमोर उघड केला. यावेळी भरारी या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Schoolशाळा