कर्जतमध्ये मुली उतरल्या रस्त्यावर!
By Admin | Updated: July 20, 2016 05:43 IST2016-07-20T05:43:24+5:302016-07-20T05:43:24+5:30
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी कर्जतमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरल्या

कर्जतमध्ये मुली उतरल्या रस्त्यावर!
कर्जत (अहमदनगर) : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी कर्जतमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरल्या, त्यांनी मूकमोर्चा काढला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
कर्जत बसस्थानक तसेच रस्त्यावर पोलीस कर्मचारी नेमावेत. आयुष्याची स्वप्ने उधळणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी. पुन्हा अशी वेळ कोणावर येऊ नये, यासाठी मुलींनी स्वसंरक्षणास तयार रहावे. आरोपींचे अवयव तोडून त्यांना मारा, तेव्हाच पीडित मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा संतप्त भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)
>लातुरात बस जाळली
कोपर्डीच्या निषेधार्थ भोईसमुद्रा (लातूर) येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बस जाळली़ लातुरात सर्वपक्षीय बंदचे आवाहन करण्यात आले होते़ नाशिकमध्ये बहुजन समाज एकीकरण संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़
>जबाबदारी स्वीकारणार
या प्रकरणाचा पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे विशेष महिला अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे टिष्ट्वट मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी केले आहे़ त्यावर रश्मी शुक्ला म्हणाल्या, मी टिष्ट्वटरवर वाचले आहे़ त्यासंबंधी आदेश आला की जबाबदारी स्वीकारणार आहे़
>कारवाईला विलंब नाही - दीक्षित
पुणे : कोपर्डी येथील बलात्कार व हत्याप्रकरणी माहिती मिळताच पहिल्या आरोपीला अटक केली. कारवाईला विलंब झाला असे म्हणता येणार नाही, असे पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी सांगितले़ पहिल्या दिवशी मुलीच्या भावाने दिलेल्या माहितीवरून आरोपीला पकडण्यात आले़ दुसऱ्या दिवशी आणखी एक जबाब दिल्यानंतर सर्वांना अटक पकडण्यात आले.