बलात्काराला विरोध केल्याने मुलीचा खून

By Admin | Updated: October 23, 2015 02:16 IST2015-10-23T02:16:18+5:302015-10-23T02:16:18+5:30

तालुक्यातील समनापूर येथे एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह बुधवारी रात्री आढळून

Girl's blood after opposing rape | बलात्काराला विरोध केल्याने मुलीचा खून

बलात्काराला विरोध केल्याने मुलीचा खून

बीड : तालुक्यातील समनापूर
येथे एका १५ वर्षीय मुलीचा
मृतदेह बुधवारी रात्री आढळून
आला होता. त्या मुलीच्या एका नातेवाइकाने दारुच्या नशेत
तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला असता तिने विरोध केल्यामुळे तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचे गुरुवारी तपासात समोर आले.
अशोक बाजीराव घाडगे (४२) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली.
ही पीडित मुलगी जिल्हा परिषद शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती. बुधवारी दुपारी तिची आई बाहेर गेलेली असताना अशोक घाडगे याने तिला घराबाहेर बोलवले. अशोक हा दारुच्या नशेत होता. त्याने घराच्या मागच्या बाजूला नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.
पण तिने जोरदार विरोध केल्याने अशोकने तिच्या डोक्यात दगड घातला. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाली. त्यानंतर तो तेथून फरार झाला. पण पोलिसांनी २४ तासांच्या आत त्याला जेरबंद केले, अशी माहिती पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली.
(प्रतिनिधी)

Web Title: Girl's blood after opposing rape